पगाराबद्दल विचारल्याने महावितरण कंत्राटी कर्मचारी बडतर्फ

    24-Jun-2020
Total Views | 155

NTN RAUT_1  H x


 



रत्नागिरीत प्रशासनाचा मुजोरपणा उघ़ड


रत्नागिरी : दोन वर्षा पासून रत्नागिरीत महाराष्ट्र विद्युत वितरण कर्मचारी मर्यादीत रत्नागिरी उपविभाग शहर शाखा क्रमांक ३ कार्यालयात विक्रम नरेंद्र चौघुले आणि शहर शाखा क्रमांक ५, देवेंद्र शशिकांत राऊत हे दोघे आऊटसोर्स या पदावर कार्यरत होते. मागील दोन वर्ष त्यांनी दिवस रात्री त्यांचे कर्तव्य चोख पार पाडले. मागील दोन वर्षात त्यांच्या विरोधात एकही तक्रार नोंदवली गेली नाही. गरज भासल्यास अहोरात्र निसंकोच सेवा देत होते. कोविड-१९ महामारी (लॉकडाऊन) च्या काळात २४ तास कोणत्याही मोबल्याची अपेक्षा न बाळगता अत्यावश्यक सेवा बजावत होते.
मार्च २०२० ला महाराष्ट्र विद्युत वितरण क.मर्या.रत्नागिरी मध्ये कोल्हापूर विद्युत अँपरांटीस यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले त्यामुळे सर्व कामगारांच्या बँकेच्या खात्याची पूर्ण माहिती नव्याने देऊन सुद्धा एप्रिल महिन्याचा पगार खात्यात जमा झाला नसल्यामुळे विक्रम नरेंद्र चौघुले आणि देवेंद्र शशिकांत राऊत यांनी संस्थेचे तांबोळी यांना दूरध्वनी वरून विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले की अकाउंट डिपार्टमेंटमधून चुकी झाली आहे, असे सांगण्यात आले. त्यांच्या चुकीमुळे तुमच्या दोघांचे पगार दुसरीकडे गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या महिन्याचा पगार उशिरा मिळेल.

तेव्हा देवेंद्र राऊत यांनी तांबोळी यांना विचारलं उशिरा म्हणजे किती दिवसाने होईल एवढे विचारले असताना तांबोळी यांना विचारणा केल्याबद्दल राग आला. त्वरित काम सोडून जा त्यांनी दिनांक २०.५.२०२० ला उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण क.मर्या. रत्नागिरी शहर उपविभाग यांच्या नावे पत्र पाठवले की विक्रम नरेंद चौघुले आणि देवेंद्र शशिकांत राऊत यांना कामावर हजर न ठेवण्याबाबत या पत्रात असे कारण दिले आहे की, विक्रम नरेंद चौघुले आणि देवेंद्र शशिकांत राऊत या दोघांनी संस्था संचालक आणि आणि संस्था सचिव यांच्याशी दूरध्वनी वरून उद्धट भाषेत वर्तन केल्याने यांना कामावरून कमी करण्यात येत आहे.

वास्तविक पगार कधी मिळणार हे विचारणे म्हणजे उद्धट वर्तन होवू शकत नाही, असे कामावरून कमी केलेल्या कामगारांचे म्हणणे आहे. पगाराची विचारणा ही काही कामगाराची चूक नाही. उलट संस्थेच्या अकाऊंट डिपार्टमेंटने चुकी केली. आणि शिक्षा मात्र कामगारांना मिळाली. ही लोकशाही नसून एकप्रकारची हुकूमशाहीच आहे असे या कामगारांचे मत आहे. कोल्हापूर विद्युत अँपरांटीसचे संस्था संचालक आणि संस्था सचिव यांनी या लॉकडाऊनच्या काळात एखाद्या कामगारांना क्षुल्लक आशा कारणारवरून तडकाफडकी कामावरून काढणे हे कितपत याेग्य आहे. हातातील नोकरी घालवून बेरोजगारी वाढवणे कितपत येग्य आहे.
विक्रम नरेंद चौघुले आणि देवेंद्र शशिकांत राऊत यांच्या कुटूंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे याला जवाबदार फक्त कोल्हापूर विद्युत अँपरांटीसचे संस्था संचालक आणि संस्था सचिव असल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे संस्थेच्या या भूमिकेवर कामगार वर्ग नाराजी व्यक्त करत आहे. तसेच रत्नागिरीतील भूमीपुत्रांवर झालेल्या अन्यायाची दखल लोकप्रतिनिधींनी घ्यावी अशी मागणी होत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

Waqf Amendment Bill २ एप्रिल २०२५ रोजी संसदेत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले आहे. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि गरीब निराधार महिलांसाठी हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी वक्फची एकूण माहिती दिली. त्यावेळी अनेक विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना त्याचा फायदा होईल असेही ..

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121