सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ११ तास चौकशी!

    19-Jun-2020
Total Views | 219
rhea_1  H x W:

सुशांतने यशराज फिल्म्स सोडायला सांगितले होते; चौकशी दरम्यान रियाची माहिती 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात बॉलीवुड अभिनेत्री रिया चक्रवतीने आपला जवाब नोंदवला आहे. तिची वांद्रे पोलिसांकडून तब्बल ११ तास तिची चौकशी करण्यात आली. मागील काही दिवसांपासून रिया आणि सुशांत रिलेशनमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत असल्यामुळेच सुशांतच्या आत्महत्येच्या मागील कारणांचा तपास करण्यासाठी रियाचा जबाब अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे.


अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांना जबाब दिला आहे. यात तिने अनेक महत्वाच्या गोष्टी पोलिसांना सांगितल्या आहेत. रियाने पोलिसांना सांगितले की सुशांतने तिला जवळपास एक वर्षापूर्वी यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते. रियाने पोलिसांना सांगितले की, 'मला सुशांतने यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते, सुशांत म्हणाला मी ही यशराज सोडत आहे.' सुशांत हे का बोलला, त्याला स्वत: यशराजला का सोडायचे होते? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी यशराज फिल्म्स आणि सुशांत यांच्यातील कराराची कागदपत्रे पोलिसांनी मागितली आहेत. त्याचवेळी पोलिस यशराजचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांना चौकशीसाठी बोलवण्याची तयारी करत आहेत.


पोलिसांनी रियाकडे तब्बल अकरा तास चौकशी केली. त्याच बरोबर सुशांत सिंहच्या दोन माजी सेक्रेटरीचा ही जबाब नोंदविण्यात आला आहे. सकाळी अकराच्या दरम्यान पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या रियाला रात्री दहाच्या दरम्यान पोलिसांनी घरी सोडण्यात आले. सध्या सोशल मीडियात पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतानाचे हे रियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने ब्रांद्रा येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. परंतु, त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, पाटणामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या अस्थी विसर्जन करण्यात आले. सुशांतच्या वडिलांनी त्याच्या अस्थिंचे विसर्जन केले
अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121