२०२१मध्ये भारताकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद

    19-Jun-2020
Total Views | 273

UNSC_1  H x W:




नवी दिल्ली :
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) चा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली. याचबरोबर पुढीलवर्षी म्हणजेच ऑगस्ट २०२१मध्ये भारत १५ शक्तिशाली देशांच्या परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारेल. यातील प्रत्येक सदस्य देशाला एका महिन्यासाठी परिषदेचे अध्यक्षपद देण्यात येते. संयुक्त राष्ट्र संघ प्रवक्त्याच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार भारत पुढील वर्षी ऑगस्टमध्ये भारताकडे या परिषदेचे अध्यक्षपद असेल.




त्यानंतर, २०२२मध्ये भारत पुन्हा एका महिन्यासाठी परिषदेचा अध्यक्ष होईल. पुढीलवर्षी जानेवारीत ट्युनिशिया या परिषदेचे अध्यक्ष असेल. यानंतर ब्रिटन, अमेरिका, व्हिएतनाम, चीन, एस्टोनिया, फ्रान्स, भारत, आयर्लंड, केनिया, मेक्सिको आणि नायजर प्रत्येकी एका महिन्यासाठी अध्यक्ष होतील. उल्लेखनीय बाब म्हणजे, सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या पाठिंब्याने भारत दोन वर्षांसाठी अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेला आहे.



या अभूतपूर्व निवडणुकीत कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर १९२ सदस्य देशांतील मुत्सद्दींनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आणि मास्क घालून मतदान केले. सुरक्षा परिषदेच्या पाच तात्पुरत्या जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये आशिया-पॅसिफिक देशांच्या प्रवर्गातील भारताला १९२ पैकी १८४ मते मिळाली. सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य म्हणून भारताची दोन वर्षांची मुदत १ जानेवारी २०२१ पासून सुरू होईल. याशिवाय आयर्लंड, मेक्सिको, केनिया आणि नॉर्वे या देशांनीही निवडणूक जिंकली. भारत, नॉर्वे, केनिया, आयर्लंड आणि मेक्सिकोसमवेत चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या पाच स्थायी सदस्यांसह एस्टोनिया, नायजर, सेंट व्हिन्सेंट, ट्युनिशिया आणि व्हिएतनाम या सुरक्षा मंडळात असतील. यावर्षी बेल्जियम, डोमिनिकन रिपब्लिक, जर्मनी, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. यापूर्वी भारत १९५०-१९५१, १९६७-६८, १९७२-७३, १९७७-७८, १९८४-८५, १९९१-९२ आणि २०११-१२मध्ये भारत परिषदेचा तात्पुरता सदस्य होता.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121