'क्वारंटाईन' विषयावर दर्जेदार लघुपट 'कुलूपबंद'!

    18-Jun-2020
Total Views | 59
Kulup band_1  H

'क्वारंटाईन' प्रक्रियेविषयी जनजागृती करणार ‘कुलुपबंद’ लघुपट!

मुंबई : सध्या जमाना डिजिटलचा आहे. अधिकाधिक प्रेक्षकवर्ग वेबसीरिज पाहण्यातच आता दंग असतो. अगदी कमी कालावधीत उत्तम कंटेन्ट, फुल टू मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं. लघुपटाचे देखील अगदी तसेच आहे. लघुपटही अगदी कमी वेळात प्रेक्षकांना खूप काही सांगून जातात. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना अगदी साध्या-सोप्या भाषेत मांडण्याची ताकद लघुपटात असते. हे लघुपट मनोरंजन तर करतातच त्याचबरोबर काही तरी सामाजिक संदेशही देऊन जातात. थोड्याशा कालावधीत बरेच काही सांगून जातात हे लघुपट. त्यांच्या विषय आणि आशयामध्ये एवढी ताकद नक्कीच असते. सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षक जुन्या मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिज पाहण्यात दंग आहेत. शिवाय उत्तमोत्तम लघुपटही प्रेक्षक पाहत आहेत. अशातच लॉकडाऊनच्या या काळात आणखी एक "कुलूपबंद" नावाचा दर्जेदार लघुपट युट्युबवर प्रदर्शित झाला आहे.


आशिष निनगुरकर या नवोदित दिग्दर्शकाने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. आशिषने याआधी काही लघुपट व माहितीपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच काही चित्रपट,लघुपट व माहितीपटांचे लेखनही त्याने केले आहे.त्याने लॉकडाऊनच्या काळात याआधी दिग्दर्शित केलेल्या 'नियम' या लघुपटाने बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारली आहे. 'कोरोना' व्हायरसच्या परिस्थितीत आशिषने घरात राहून 'कुलूपबंद' हा सामाजिक संदेश देणारा लघुपट तयार केला आहे. 'वर्क फ्रॉम होम'च्या धर्तीवर घरच्या घरीच हा लघुपट चित्रीत झाला आहे. स्वतःचा 'मोबाईल' हा 'कॅमेरा', घरातील 'कुटूंब' हेच 'कलाकार' आणि स्वतःचे राहते 'घर' हेच 'लोकेशन' वापरून आशिषने 'कुलूपबंद' हा लघुपट निर्मिती केला आहे. आशिष सोडला तर या क्षेत्रात बाकी घरातील सर्व नवखे आहेत. आशिषने शॉर्टफिल्मची संकल्पना घरात ऐकवली आणि अवघ्या एक दिवसात 'कुलूपबंद' नावाचा सामाजिक संदेश देणारा हा लघुपट चित्रीत झाला.बाहेरच्या जिल्ह्यातून घरी आल्यावर 'क्वारंटाईन' म्हणून 'नियम' पाळणे बंधनकारक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 'सोशल डिस्टन्स' ठेवून सगळ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. 'सुरक्षित अंतर पाळा,कोरोना संसर्ग टाळा' हा अनमोल संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.


'कुलूपबंद' या लघुपटाची निर्मिती 'काव्या ड्रीम मुव्हीज' अंतर्गत किरण निनगुरकर यांनी केली असून या लघुपटात आशिषचे भाऊ अनुराग निनगुरकर व स्वरूप कासार यांनी भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटासाठी लेखन,छायाचित्रण,निर्मिती व्यवस्थापन व दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका आशिषने निभावली आहे. संकलन व संगीत अभिषेक लगस यांचे असून संजय कासार व रुपाली कासार यांचे या लघुपटासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. 'क्वारंनटाईन' या अत्यंत महत्वाच्या विषयावर सामाजिक संदेश देणारा हा लघुपट नुकताच युट्युब वर प्रदर्शित झाला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121