फुग्यांना घाबरला हुकूमशहा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2020   
Total Views |

kim john uun_1  



मात्र, नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे किम जोंग उन डरपोक आहे की काय, अशी शंकाही निर्माण होते आणि त्याला कारण ठरले ते फुगे. हो, फुगेच आणि किम जोंग उन या फुग्यांनाच घाबरल्याचे वृृत्त आहे. म्हणजे अमेरिकेसारख्या महासत्तेला स्वतःच्या क्षेपणास्त्र, अस्त्र-शस्त्रास्त्रांनी धमकावणारा किम जोंग उन साध्या फुग्यांना घाबरला! पण असे काय झाले की, किम जोंग उनवर फुग्यांमुळे भेदरण्याची वेळ आली?



मानवी इतिहासात अनेक हुकूमशहांचा उल्लेख येतो. निरनिराळ्या देशांतल्या हुकूमशहांनी कशाप्रकारे राज्य केले, जनतेवर जुलूम-जबरदस्ती, अन्याय-अत्याचार केले, याचे वर्णनही वाचायला मिळते. अटिला द हुन, चंगेज खान, तैमुरलंग, क्विन मेरी पहिली, ब्लादीमीर लेनिन, जोसेफ स्टॅलिन, अडॉल्फ हिटलर, माओ झेडॉन्ग, इदी अमीन, ऑगस्टो पिनोशे ही त्यापैकी काही हुकूमशहांची नावे. दरम्यान, १७-१८ व्या शतकात युरोपात स्वातंत्र्य, बंधुता आणि समता या तीन तत्त्वांच्या आधारे राज्यक्रांती झाली आणि अनेक ठिकाणच्या हुकूमशाही किंवा राजेशाही सत्ता उलथल्या गेल्या व तिथे लोकशाही राज्ये स्थापन झाली. पण, जगात अजूनही अनेक देशांत राजेशाही-हुकूमशाही सुरुच आहे आणि तिथल्या जनतेचा आवाज दबलेला आहे. असाच एक देश म्हणजे उत्तर कोरिया आणि तिथला शासक किम जोंग उन. हुकूमशाही असल्याने उत्तर कोरियातील जनतेला लोकशाही राजवटीत मिळणारे हक्क आणि अधिकार नाहीत. तसेच उत्तर कोरियात अभिव्यक्तिस्वातंत्र्य किंवा प्रसारमाध्यमांनाही परवानगी नाही. त्यामुळे तिथे नेमके काय चालते, हे बाह्य जगातील जनतेला कधीच कळत नाही. पण, उत्तर कोरियन सत्ताधीशाच्या तावडीतून सुटलेल्या नागरिकांकडून तिथे नेमके काय चालते, याची माहिती नक्कीच मिळते आणि ती ऐकल्यानंतर खुल्या जगात वावरणार्‍यांचा थरकाप उडतो. जनतेला भोगाव्या लागणार्‍या हालअपेष्टा, दारिद्य्र, शोषणाच्या कथा समजल्यानंतर चीडही येते. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे किम जोंग उन डरपोक आहे की काय, अशी शंकाही निर्माण होते आणि त्याला कारण ठरले ते फुगे. हो, फुगेच आणि किम जोंग उन या फुग्यांनाच घाबरल्याचे वृृत्त आहे. म्हणजे अमेरिकेसारख्या महासत्तेला स्वतःच्या क्षेपणास्त्र, अस्त्र-शस्त्रास्त्रांनी धमकावणारा किम जोंग उन साध्या फुग्यांना घाबरला! पण असे काय झाले की, किम जोंग उनवर फुग्यांमुळे भेदरण्याची वेळ आली?




उत्तर कोरियातील त्रासाला कंटाळून मोकळा श्वास घेण्यासाठी अनेक लोक शेजारच्या दक्षिण कोरियात पळून गेले. पण, या लोकांनी किम जोंग उनच्या हुकूमशाहीचा विरोध करणे सोडले नाही व सीमेवरुन हायड्रोजन वायू भरलेले हजारो फुगे आकाशात सोडले. या फुग्यांवर हुकूमशहा किम जोंग उन आणि त्याच्या सत्तेविरोधात, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत अनेकानेक घोषणा, माहिती लिहिलेली असते, तसेच अनेक चिठ्ठ्याही जोडलेल्या असतात. उडत उडत हे फुगे उत्तर कोरियात जाऊन पडतात आणि तिथले लोक ते उचलतात. त्यावर लिहिलेल्या घोषणा, त्यासोबतच्या चिठ्ठ्या ते वाचतात. पण, किम जोंग उनला आपल्या काळ्या करतुतींबद्दल अशाप्रकारे कोणी लिहिलेले आवडत नाही, आवडले नाही. कारण, त्यामुळे आपण आतापर्यंत दमनतंत्राने दाबलेल्या जनतेत जागृती निर्माण होऊ शकते म्हणून. त्यामुळेच दक्षिण कोरियाच्या सीमाभागातून होणार्‍या या गतिविधींमुळे तो चांगलाच नाराज झाला आणि त्याने दक्षिण कोरियाला हे रोखायलाही सांगितलेे. दक्षिण कोरियाने काही दिवस हा प्रकार रोखलाही, पण नंतर पुन्हा या गतिविधी सुरु झाल्या. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियातून पळून आलेल्यांनी अशाप्रकारचे हजारो फुगे पुन्हा एकदा आकाशात सोडले. यावेळी मात्र, हुकूमशहा किम जोंग उन याने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आणि किम यो जोंग या आपल्या बहिणीला याविरोधात कठोर कारवाई करायला सांगितले.



भावाच्या सांगण्यावरुन किम यो जोंग हिने दक्षिण कोरियाला लष्करी कारवाईची धमकी दिली. तत्पूर्वी दोन्ही देशातील फोनलाईन व हॉटलाईनही बंद करण्यात आल्या. तसेच, दक्षिण कोरियाबरोबरील सर्वप्रकारचे संबंध संपवण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. सोबतच २०१८ सालचा दोन्ही देशांतील सैन्य करार रद्द करण्यात येईल, असेही उत्तर कोरियाने म्हटले. त्यानुसार सीमेवरील संपर्क कार्यालयेदेखील बंद करण्यात आली. मात्र, शस्त्रसज्ज उत्तर कोरियाच्या धमकीमुळे दक्षिण कोरिया दहशतीच्या छायेखाली आला व त्या देशाने उत्तर कोरियासमोर चर्चेचा आग्रह धरला. आता त्या पुढे काय होईल ती होईल, पण फुग्यांसारखा एक साधा मार्ग वापरुनही हुकूमशाही राजवटीचा पाया हलवता येतो, हे या घटनेतून दिसून आले. तसेच स्वतःला सर्वसत्ताधीश समजणारा हुकूमशहा जनतेच्या छोट्याशा विरोधाला घाबरु शकतो, हेही यातून समजते.
@@AUTHORINFO_V1@@