परदेशातून परतणाऱ्या भारतीयांसाठी मुंबईत अलगीकरण कक्ष

    08-May-2020
Total Views | 50
OverSeas _1  H

पालिकेतर्फे मुंबईतील ८८ हॉटेलमध्ये ३३४३ कक्ष आरक्षित



मुंबई : लॉकडाऊनच्या काळात जगभरात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी ८८ हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधसाठी जगभरात सुरू असलेल्या लॉक डाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणले जाणार आहे. याअंतर्गत मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एकूण ८८ हॉटेलमध्ये मिळून ३,३४३ कक्ष आरक्षित केले आहेत.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जगभरात बहुतेक सर्व देशांनी लॉक डाऊनचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या प्रयत्नात विविध बारा देशातून, ६४ विमान फेऱ्यांमधून एकूण १४,८०० प्रवासी भारतात येणार आहेत. पैकी मुंबईमध्ये एकूण सात विमानातून सुमारे १,९०० नागरिक येतील. बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत परतणार आहेत.

परतलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जाणार आहे. अलगीकरण कालावधीत तपासणी केल्यानंतर कोरोना बाधा झालेली आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. अलगीकरण करण्यासाठी मुंबईतील विविध ८८ हॉटेलमध्ये एकूण ३,३४३ कक्ष आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन, तीन, चार, पाच तारांकित तसेच वेगवेगळ्या हॉटेल्स सोबत अपार्टमेंट हॉटेलचा देखील समावेश असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121