
५० टक्के कर्मचाऱ्यांसह सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार
पुणे : पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून आयटी कंपन्या सुरु करण्याची परवानगी उद्योग विभागाने दिली आहे. ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आयटी कंपन्या सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे. पुणे महापालिका हद्दीत केवळ अत्यावश्यक सेवा असलेल्या उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणच्या आयटी कंपन्यांनाही परवानगी देण्यात आली.
पुणे शहरातील मगरपट्टा, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कोथरूड, चांदणी चौक, नांदेड सिटी, रामवाडी परिसर, डेक्कन, नळस्टॉप, पाषाण, बाणेरसह इतर विविध ठिकाणी आयटी कंपन्या आहेत. काही अटी आणि शर्ती तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पुणे शहरात जवळपास ४५० मोठे आणि १४०० लहान आयटी कंपन्या आहेत. तर ७२ आयटी पार्क असून या कंपन्यांमध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात.