क्वारंटाईन सेंटरसाठी मेहबूब स्टुडिओ, झेवियर्स कॉलेजही पालिकेच्या ताब्यात!

    23-May-2020
Total Views | 34

qurantine centre_1 &



कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या बघता पालिकेकडून क्वारंटाईन बेडची संख्या वाढवण्याची उपाययोजना


मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासन चिंतेत असून संकटाला तोंड द्यायची जय्यत तयारी करत आहे. क्वारंटाईन सेंटरसाठी वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओसह फोर्ट झेवियर्स, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि मांटुगांचे डिजी रुपारेल कॉलेज पालिकेने ताब्यात घेतले आहे.


पालिका प्रशासनाने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे एमएमआरडीए मैदानात आणि गोरेगावमधील नेस्को येथे क्वारंटाईन सेंटर उभारले आहेत. आता वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओसह फोर्ट झेवियर्स, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि मांटुगांचे डिजी रुपारेल कॉलेज पालिकेने ताब्यात घेतले आहे. सध्या ही ठिकाणे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.


मेहबुब स्टुडिओमध्ये जवळपास १००० बेड्सची सोय करण्यात आली आहे. सेंट झेवियर्स कॉलेज आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट्स येथेही बेड्स सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तर माटुंगाच्या डीजी रूपारेल कॉलेजचे सभागृहही ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.


एच पूर्व या वॉर्डमध्ये १००० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर ३५ हून अधिक मत्यूंची नोंद झाली आहे. तर एच पश्चिममध्ये ४१९ रुग्ण आढळली असून ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शास्त्री नगर, खार दांडा आणि गझरबंध यासारख्या ठिकाणी देखील अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.


आयकॉनिक सेंट झेवियर्स कॉलेजचा हॉल आणि कँटिनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना ठेवण्यात येणार आहे. जवळपास १८० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कॅम्पसमधील झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च बिल्डिंगच्या टेरेसवर ७० बेड्सची व्यवस्था केली आहे. याशिवाय जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या हॉलमध्येही ८० बेड्स व्यवस्था करण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121