'हा' विमा असेल तर नोकरी गेल्यावरही मिळू शकतो पगार !

    21-May-2020
Total Views | 174
JOB cover _1  H







मुंबई : कोरोनाच्या वाढत्या समस्येचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याचीही चिन्हे आहेत. अनेकांना आपली नोकरी जाईल याची चिंता सतावत आहे. अशावेळी आपण 'जॉब इन्शुरन्स पॉलीसी'चा पर्याय निवडू शकता. वाईट काळात आर्थिक भार उचलण्यास यामुळे मदत होईल. अशा पॉलीसीच्या नियमावलीमध्ये दिलेल्या कारणामुळे जर नोकरी गेली तर कर्मचाऱ्याला संरक्षण मिळू शकते. त्याला आपल्या पगारा इतकी रक्कम दरमहा मिळू शकते. 


गंभीर दुर्घटना, अपंगत्व किंवा अन्य बऱ्याच कारणांचा अंतर्भाव केलेला असतो. मुख्य पॉलीसीमध्ये रायडर किंवा अॅड ऑन कव्हरही दिले जाते. पॉलीसीनुसार नोकरी गेल्यावर किंवा तात्पुरते निलंबन झाल्यावर संरक्षण दिले जाते. तसेच पॉलीसीचे तीन मोठे हप्तेही कंपनीतर्फे भरले जातात. अर्जदार हा नोकरदार असला पाहिजे तसेच तो काम करत असल्या कंपनीची नोंदणीही व्हायला हवी, अशा इतर अटीही या पॉलीसीमध्ये असतात. नोकरी गेल्यानंतर विमा कंपनीला पॉलीसीधारकाला माहिती द्यायला लागते. त्यानंतर पडताळणीत सर्व दावे खरे ठरले तर विमा कंपनी ग्राहकाला नुकसानभरपाई देते. दरम्यान, कर्मचाऱ्याची चुकीचे वर्तन, फसवणूक आदी कारणास्तव नोकरी गेल्यास त्याला विमाकवच मिळू शकत नाही. प्रोबेशन पीरियड दरम्यान नोकरी गेल्यासही विमाकवच मिळत नाही. कुठलाही विमा घेताना त्याची नियमावली आणि अटीं वाचून घेणे अत्यावश्यक आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरलेल्या शहरी माओवाद आणि नक्षली चळवळीविरोधात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ प्रस्तावित आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आणि प्रस्तावदेखील राज्य सरकारच्यावतीने सार्वजनिक स्वरूपात मागवण्यात आले असून, त्या सूचनांचाही कायद्याचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी विचार केला जाईल. परंतु, या कायद्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्मिती नक्षली संघटनांकडून सुरु आहे. त्यानिमित्ताने या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आणि कायद्याविरोधातील अपप्रचाराचे षड्यंत्र, याविषयी ‘विवेक विचार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121