पक्षी स्थलांतर - एक आश्चर्य

    11-May-2020
Total Views | 453
bird_1  H x W:
 
 
 

जगाला जोडणाऱ्या पक्ष्यांचा आढावा

 
सिद्धेश सुर्वे -  यंदा ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ ९ मे रोजी साजरा झाला. २००६ मध्ये ’युनायटेड नेशन्स’ने मे महिन्याचा दुसरा शनिवार ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ म्हणून साजरा करायचे ठरवले. ज्याद्वारे स्थलांतरित पक्षी व त्यांच्या स्थलांतरणाबाबत जनजागृती निर्माण होईल. दरवर्षी या दिवसाकरिता एक विषय ठरवण्यात येतो, ज्यात स्थलांतरित पक्ष्यांना असणार्‍या धोक्यांवर भर दिला जातो. या वर्षीचा विषय ‘जगाला जोडणारे पक्षी’ असा आहे. याद्वारे जगभरातील विविध नैसर्गिक अधिवासांना असणारा धोका आणि त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांना निर्माण होणार्‍या धोक्यांवर लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 
 
 
आता पक्षी स्थलांतर म्हणजे नक्की काय हे पाहू. पक्षी स्थलांतर म्हणजे विणीच्या स्थानाकडून मुबलक अन्नसाठा असलेल्या ठिकाणापर्यंत व परत विणीच्या स्थानाकडे होणारा पक्ष्यांचा वार्षिक प्रवास. या प्रवासात पक्षी काही किलोमीटरपासून काही हजार किलोमीटरचा प्रदेश ओलांडतात. यादरम्यान ते एक ते अनेक देशांना पार करतात. स्थलांतराचे एकूण १२ प्रकार आहेत. मात्र, यातील सर्वात अधिक आढळणारा प्रकार म्हणजे ऋतूनुसार होणारे स्थलांतर. यात उत्तरेकडील थंड प्रदेशातील पक्षी दक्षिणेकडील गरम प्रदेशात थंडीपासून स्वत:चे संरक्षण करण्याकरिता येतात. यात ते मुबलक अन्नसाठा व कमी स्पर्धा असलेल्या ठिकाणांची निवड करतात.
 

bird_1  H x W:  
 
 
या स्थलांतर प्रक्रियेविषयी सर्वसाधारणपणे निर्माण होणार प्रश्न म्हणजे. पक्षी हे स्थलांतराची वेळ कशी ठरवतात? आपण पाहत असलेले पक्षी हे हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार झालेले आहेत. त्यांना स्थलांतरणाकरिता लागणारी प्रेरणा ही त्यांच्या पुर्वजांकडून आलेल्या जनुकांमधून मिळाली आहे. त्यासोबत बदलणारे हवामान, दिवसांचा अवधी, अन्नाचा साठा, इ. नैसर्गिक घटनाही स्थलांतरणाला प्रेरणा देतात. हे स्थलांतर विविध पद्धतीने होत असते त्यामुळे अद्यापही त्याची अचूक यंत्रणा समजलेली नाही. आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायचे असेल, तर आपण नकाशा, तक्ते किंवा हल्लीच्या काळात ‘गुगलमॅप’ सारख्या उपकरणांचा वापर करतो. परंतु, या सगळ्याशिवाय हे पक्षी आपला मार्ग कसा ठरवतात? हे पक्षी दरवर्षी थोड्याफार फरकाने त्याच जागी कसे पोहोचतात? यामागचे कारण आहे पृथ्वीचे चुंबकत्व. पक्ष्यांना हे चुंबकत्व जाणवते आणि त्याआधारे ते आपला मार्ग ठरवतात. त्याच सोबत चंद्र-सूर्य, तारे यांची दिशा, हवेचा वेग व दिशा, विविध भूभाग अशा अनेक खुणगाठींच्या साहाय्याने ते दरवर्षी एकाच स्थळी पोहोचतात.
 
 

bird_1  H x W:  
 
 
स्थलांतरित पक्ष्यांबद्दलची काही मज़ेदार माहिती
 
 
सर्वात उंच उडणारा पक्षी : दरवर्षी ’बार-हेडेड गीज’ हे पक्षी आपले विणीचे स्थान म्हणजे चीन किंवा मंगोलियावरुन स्थलांतर करून भारतात येतात. या प्रवासात ते हिमालय पर्वत ओलांडून म्हणजेच २९ हजार फूट उंचीवरून उडत येतात. इतर कोणताही पक्षी हे करू शकत नाही.
 
सर्वात लांबचा अखंड प्रवास करणारा पक्षी : ‘बार-टेल्ड गॅडविट’ हा पक्षी ११ हजार किमीचे अंतर म्हणजे अलास्का ते न्यूझीलॅण्डचा प्रवास न थांबता सहा दिवसांत पूर्ण करतो.
 
 
उडण्याचा विश्वविक्रम करणारा पक्षी : दरवर्षी ’आर्टीक टर्न’ हे पक्षी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे स्थलांतर करतात व परत येतात. हे करताना ते साधारण वर्षभरात ७० हजार ९०० किमींचे अंतर पूर्ण करतात. पूर्ण आयुष्यात हा पक्षी चंद्राकडे तीनदा जाऊन येता येईल इतके अंतर उडतो.
 
 

bird_1  H x W:  
 
 
पक्ष्यांचे संवर्धन 
स्थलांतर करताना पक्षी ज्या वायुमार्गांचा वापर करतात त्याला फ्लायवेज (उड्डाणमार्ग) असे म्हटले जाते. पूर्ण विश्वात असे नऊ मुख्य उड्डाणमार्ग आहेत. या मार्गांवरील अनेक ठिकाणी हे पक्षी विश्रांतीकरिता थांबतात. त्यामुळे या पक्ष्यांचा सुरक्षेचा विषय जागतिक पातळीचा असून त्यांच्या उड्डाणमार्गातील प्रत्येक प्रदेशाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. हे उड्डाणमार्ग सुरक्षित झाल्यास यावर प्रवास करणार्‍या सर्व पक्ष्यांना अभय मिळेल व त्याकरिता जगभरातील अनेक संस्था कार्यरत आहेत. ’कांदळवन कक्ष’ (मँग्रोव्ह सेल) आणि ’महाराष्ट्र कांदळवन प्रतिष्ठान’ (मँग्रोव्ह फाऊंडेशन) हे ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएनएचएस) मदतीने महाराष्ट्रातील स्थलांतरित पक्ष्यांकरिता महत्त्वाच्या असणार्‍या पाणथळ जागांचा अभ्यास करीत आहे. तसेच, या पक्ष्यांचा स्थलांतरणाचा मार्ग व पद्धती यांचाही अभ्यास करीत आहेत. याकरीता त्यांना विशिष्ट प्रकारचे झेंडे व रिंगा लावल्या जातात. आपल्याकडे येणारे पक्षी हे मध्य-आशियाई उड्डाणमार्गावरुन येतात व वरील अभ्यासांमुळे त्यांचा मार्ग व देशातील महत्त्वाच्या थांब्यांची माहिती मिळणे शक्य होईल.
 
 
(लेखक ’मँग्रोव्ह सेल’च्या ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’मध्ये साहाय्यक संचालक - क्षमता बांधणी पदावर कार्यरत आहेत)
अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे...

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121