तब्लीगींपासून डॉक्टरांच्या संरक्षणासाठी दिल्लीत लष्कराची टीम दाखल!

    03-Apr-2020
Total Views | 1384

narela_1  H x W


समाज कंटकांना वठणीवर आणण्यासाठी लष्करासोबत प्रोटेक्शन टीमही हजर!


दिल्ली : 'तब्लीगी जमात'चे अनेक कार्यकर्ते एकाच वेळी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिल्लीत एकच भीतीचे वातावरण आहे. त्यातच तब्लीगी जमातचे अनेक जण डॉक्टरांशी, नर्सेसशी आणि इतर मेडिकल स्टाफसोबत गैरकृत्य करत असल्याचे समोर आले. त्यामुळे दिल्लीच्या नरेला आयसोलेशन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराची एक मेडिकल टीम दाखल झाली आहे. सहकार्य न करणाऱ्या आणि स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या समाज कंटकांना वठणीवर आणण्यासाठी लष्कराने आपल्या मेडिकल टीमसोबत हत्यारांसहीत प्रोटेक्शन टीमही धाडली आहे.


भारतीय लष्कराजवळ नरेला आयसोलेशन कॅम्पकडून वैद्यकीय सेवेसाठी मदतीची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने आपल्या दोन डॉक्टरांसहीत दोन सपोर्टिंग स्टाफची एक टीम नरेला आयसोलेशन कॅम्पमध्ये धाडली आहे. या टीमसोबत लष्कराची एक छोटी प्रोटेक्शन टीमदेखील आहे.


दरम्यान, दिल्लीत कोविड १९ धोक्याच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरक्षा व्यवस्था आणखीन कडक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) १०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांमध्ये जवळपास १०,००० जवान तैनात आहेत.


दिल्लीतील निझामुद्दीन येथे मरकझला गेलेल्या ९ हजार लोकांची ओळख पटली आहे. या ९००० पैंकी १३०६ लोक परदेशी नागरिक आणि उरलेले इतर भारतीय आहेत. यातील जवळपास ४०० जण करोना संक्रमित असल्याचे समोर आले आहे. तब्लीगी जमातशी निगडीत १८०४ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121