पेंटॅगॉनच्या 'त्या' व्हिडिओंमधले गूढ कायम

    28-Apr-2020
Total Views | 45

America UFO_1  





वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या पेंटॅगॉन’ या संरक्षण मुख्यालयाने तीन तबकडक्यांचे व्हिडिओ शेअर केल्याने जगभरात या व्हिडिओत दिसणाऱ्या गोष्टींचे गूढ वाढते आहे. अमेरिकेचे लष्करी मुख्यालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’ने तीन अज्ञात वस्तूंचे व्हिडिओ सोमवारी प्रसिद्ध केले. मात्र या व्हिडिओत दिसणाऱ्या वस्तूंबाबत त्यांनी कोणतेही ठोस वक्तव्य केले नाही. मात्र या व्हिडिओत दिसणाऱ्या वस्तू उडत्या तकबड्यांसारख्या (यूएफओ) असल्याच्या चर्चांना जगभरात पुन्हा एकदा उधाण आले.


दरम्यान, अमेरिकन संरक्षण दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, संरक्षण विभागाने तीन नौदल व्हिडिओ अधिकृतरित्या जारी केले आहेत. त्यात एक नोव्हेंबर २००४मध्ये घेण्यात आला होता तर दुसरा जानेवारी २०१५ मध्ये घेण्यात आला. २००७ आणि २०१७मध्ये अनधिकृतरित्या हे व्हिडीओ व्हायरल झाले होते. अमेरिकेच्या नौदलाने यापूर्वी कबूल केले होते की व्हायरल झालेले व्हिडिओ हे प्रत्यक्षात नौदलाचे आहेत. या व्हिडिओंचा सखोल आढावा घेतल्यावर, विभागाच्या असे लक्षात आले की या व्हिडिओच्या अधिकृत जारी करण्यामुळे कोणतीही संवेदनशील क्षमता किंवा प्रणाली उघडकीस येत नाही. संबंधित व्हिडीओमध्ये काय आहे किंवा काय नाही याबाबत काही गैरसमज दूर करण्यासाठी डीओडी लोकांसमोर हे व्हिडिओ जारी करीत आहे आणि व्हिडिओमध्ये चिंता करण्यासारखे काही नाही. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या हवाई घटनांचे वर्णन 'अज्ञात' म्हणून केले गेले आहे. रिलीझ केलेले व्हिडिओ नेव्हल एअर सिस्टम कमांड एफओआयएच्या वाचन कक्षात आढळू शकतात असेही अमेरिकन संरक्षण विभागाने जारी निवेदनात म्हणले आहे.त्यामुळे आता काही वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसणाऱ्या वस्तू या परग्रहावरून आलेल्या तबकड्या आहेत की हवाई मार्गात हेरगिरी करणाऱ्या अज्ञात वस्तू याचे गूढ कायम आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121