दिलासादायक ! मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोन हटविले

    24-Apr-2020
Total Views | 62

contentment zone_1 &



मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोन हटविले, १४ दिवसांत सापडला नाही एकही नवा रुग्ण



मुंबई :
मुंबईत रोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून प्रशासन चिंताग्रस्त आहे, तर नागरिक भयग्रस्त आहेत. मात्र काही ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येत असून रुग्ण बरे होवून घरी गेल्याने खुशी आहे. संसर्गाच्या शक्यतेमुळे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली मुंबईतील १८९ ठिकाणी कुठल्याही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. त्यामुळे ही ठिकाणे आता 'कंटेन्मेंट' यादीतून वगळण्यात आली आहेत.



मुंबई महानगर पालिकेने मुंबईत ९३० ठिकाणे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केली होती. त्यानंतर या भागांत लॉकडाऊनपेक्षाही कठोर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, १४ दिवसांनंतर आढावा घेऊन हे निर्बंध उठवण्यात आले. बुधवारपर्यंत १८९ ठिकाणे कंटेन्मेंट झोनच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. तरीही सध्या मुंबईत ३०० हून अधिक ठिकाणे कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील लोक राहत असलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जातो.



त्यानंतर १४ दिवस महापालिकेकडून संबंधित ठिकाणांच्या परिस्थितीची पाहणी केली जाते. या काळात कुठलाही नवा रुग्ण न आढळल्यास हे ठिकाण कंटेन्मेंट झोनच्या यादीतून वगळले जाते. वॉर्ड पातळीवरच हा निर्णय घेतला जातो,' असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या निर्बंधमुक्त झालेल्या ठिकाणांमध्ये मलबार हिलमधील काही इमारती, अरब लेन, ग्राण्ट रोड, फॉर्जेट स्ट्रीट, अँटॉप हिल-वडाळा, पवईतील हिरानंदानी, बोरिवलीतील आयसी कॉलनी, परळमधील काही चाळी, विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि लालबागचा समावेश आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121