'तबलिगी-ए-जमात' प्रकरण : नाशिकचे ३२ जण सहभागी

    02-Apr-2020
Total Views |
Nashik_1  H x W
 
 





नाशिक : दिल्लीमधील निजामुद्दीन भागात झालेल्या सोहळ्यातही नाशिकमधील काही नागरिकांचा सहभाग उघडकीस आला होता. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या नाशिक जिल्ह्यातील तब्बल ३२ व्यक्तींची प्रशासनाने खात्री पटविली आहे . शहरासह जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या चार पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम राबवून त्यापैकी २४ नागरिकांना शोधण्यात आले आहे. 
नाशिक मनपा हद्दीतील १३ नागरिकांना तपोवनात क्वॉरंटाइन करण्यात आले आहे . उर्वरित ८ नागरिक अद्याप नाशिकात आलेले नाहीत . तर ग्रामीण भागातील ११ व्यक्तींना त्यांच्या घरीच क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात अशा लोकांचा शोध घेतला नाशिकमध्ये तर महापलिकेच्या वैद्यकीय पथकाने दिल्लीत जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती घेतल्यानंतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे यादी सोपवली होती.


नाशिक शहरातील काही ठराविक उपनगरीय भागातील तसेच मालेगाव , निफाड , चांदवड , नांदगाव या तालुक्यांतील काही गावांमधील संबंधित नागरिक असल्याचे समजते . नाशिक शहरातील अनेक जण या कार्यक्रमाला गेले होते . त्यांची यादी महापालिकेने पोलीस यंत्रणेकडे सुपूर्द केली आहे .