संतापजनक : पास मागितला म्हणून पोलिसाचा हात छाटला

    12-Apr-2020
Total Views | 180

punjab_1  H x W


पतियाळा
: महाराष्ट्राप्रमाणेच पंजाबमधील स्थितीही कोरोनामुळे गंभीर झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गर्दी थांबवण्यासाठी कायद्याची कडक भूमिका घेत अमलबजावणी सुरू केली. मात्र, पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. असाच एक प्रकार पंजाबमधील पतियाळातील भाजी बाजारात ५ निहंगा शीखांनी पोलिसांवर हल्ला केला. संचारबंदी असतानाही का फिरत आहात, असा प्रश्न विचारला असता हा हल्ला केला. या हल्ल्यात एएसआय हरजीत सिंग यांचा हात कापला गेला आहे.रविवारी सकाळी भाजी बाजाराच्या मुख्य गेटवर शीखांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात इतरही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.



या हल्ल्यात हरजीत सिंग यांचा हात कापला गेल्याचे पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले. हरजीत सिंग यांना चंदीगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याशिवाय बाजाराच्या बोर्डाचे अधिकारीही जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ७ लोकांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व एका कारमधून प्रवास करत होते. मात्र, रस्त्यावर बॅरिकेड्स लावलेले असतानाही त्यांना भाजी बाजारात जायचे होते. पोलिसांनी त्यांच्याकडे कर्फ्यू पासची मागणी केली. मात्र, पास न दाखवता बॅरिकेड्सला ठोकर मारली आणि बॅरिकेड्स तोडून टाकले. त्यानंतर बाहेर येत त्यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला केला, अशी माहिती पतियाळाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनदीप सिंग सिद्धू यांनी माहिती देताना सांगितले.


निहंग शीखाने त्याच्याकडे असलेल्या पारंपरिक तलवारीने सहायक उपनिरीक्षक हरजीत सिंग यांचा हात कापला. या हल्ल्यात आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला जखम झाली आहे, असे सिद्धू यांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक सिंग यांना प्रथम तातडीने राजेंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नंतर तेथून त्यांना चंदीगडमधील रुग्णालयात हलवण्यात आले.पोलीस उपअधीक्षक मनदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘हल्ला केल्यानंतर हे टोळके घटनास्थळावरू फरार झाले. पोलिसांनी या टोळक्याचा पाठलाग केला. हे टोळके बलवाडा येथील एका गुरूद्वारात लपले होते.’ त्यानंतर या घटनेशी संबंध असलेल्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हरजित सिंह यांच्यावर शस्त्रकिया करण्यात सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121