नवी दिल्ली : कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये अनेक जणांनी पुढाकार घेत शासनाला तसेच नागरिकांना, गोर गरिबांना आपल्या परीने मदत केली आहे. अशामध्ये आता भाजप खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर याने केलेल्या मदतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी गंभीरने मदतीचा चौकार मारला आहे. एकीकडे काही खेळाडू अद्यापही हवी तसे मदतीला पुढे आले नसताना गंभीरने केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे.
देशामध्ये लॉकडाऊन असला तरी कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांना मदत तसेच सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, गंभीरने स्वतःचे सामाजिक भान जपत पहिले ५० लाख, नंतर १ कोटी आणि स्वतःच्या खासदारकीचा २ वर्षांचा पगार करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिला होता. आताही त्याने पुन्हा एकदा पुढाकार घेत १ हजार मास्क आणि प्रोटोक्टिाव्ह कीटचे मोफत वाटप केले.