नाशिकमध्ये ‘महाकवच’ची निर्मिती

    31-Mar-2020
Total Views | 122

nashik_1  H x W


कॉन्टॅक ट्रेसिंग व क्वारंटाइन ट्रॅकिंग शक्य 


नाशिक : कोरोना विषाणूचे संकट अख्या जगासमोर उभं आहे. केंद्र, राज्य, जिल्हा आणि स्थानिक अशा सर्व स्तरांवरील प्रशासन व्यवस्था, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन युद्धपातळीवर या संकटाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहे. तरी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग लक्षात घेऊन, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी - भारत सरकार, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी महाराष्ट्र शासन, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल,नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन व नाशिक स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्लॅटफॉर्म्सची निर्मिती करण्यात आली आहे. 'नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करत महाकवच हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्म्सची दोन ठळक वैशिष्ट्यं आहेत.


पहिले म्हणजे, कॉन्टॅक ट्रेसिंग आणि दुसरे क्वारंटाइन ट्रॅकिंग. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का, याचे ट्रेसिंग यामुळे शक्य होणार आहे. अशी व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती याचं ट्रेसिंग करणे या मुळे शक्य होणार आहे. शिवाय, अशी व्यक्ती हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन अशा कोणत्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वावरली होती याचं ट्रेसिंगही महाकवचमुळे अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत होणार आहे. सध्या ही तपासणी प्रशासनाला मॅन्युअल पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना पाठवून करावी लागते. यात वेळही खूप जातो. पण आता महाकवचमुळे प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित दिशेने प्रयत्न करता येतील आणि तेही कमीत कमी वेळेत.


महाकवच प्लॅटफॉर्मचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे क्वारंटाइन ट्रॅकिंग. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, परदेशातून आलेली व्यक्ती किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्ती यांनी किमान १४ दिवस स्वतःचं विलगीकरण म्हणजेच क्वारंटाइन करणं अतिशय आवश्यक आहे. पण, लोक निष्काळजीपणा दाखवतात व नियमांचे उल्लंघन करून अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत जातो. पण आता अशा व्यक्तींच्या स्मार्ट फोनमध्ये जेव्हा महाकवच अॅप इनस्टॉल केलं जाईल तेव्हा अशा व्यक्तींचं क्वारंटाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जिओ फेन्सिंग व सेल्फी अटेंडन्स. अशा व्यक्तींना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असेल. जेव्हा ही त्रिज्या ओलांडली जाईल तेव्हा अॅपद्वारे ही माहिती प्रशासनाला समजणार आहे. यानंतर योग्य ती कार्यवाही प्रशासनातर्फे होणार आहे. या अॅपचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सेल्फी अटेंडन्स. प्रशासनाकडून जेव्हा जेव्हा विचारणा होईल तेव्हा अशा व्यक्तीला सेल्फी काढून तो अॅपद्वारे प्रशासनाकडे पाठवावा लागणार आहे.


महाकवच अॅप हे केवळ कोरोना लक्षणीत व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठी असून फक्त अशाच व्यक्ती हे अॅप वापरू शकणार आहेत. त्यांना ह्या अॅपसाठी लिंक व कोड मनपाकडून पाठवण्यात येणार आहे. इतर लोकाना मात्र हे अॅप वापरण्याची परवानगी नसणार आहे.


या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी - भारत सरकार, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी - महाराष्ट्र शासन, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नाशिक स्मार्ट सिटी, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (TCS फाऊंडेशनचा उपक्रम), कुंभेथॉन इनोवेशन फाऊंडेशन या संस्थांनी पुढाकार घेतला आहे.


सध्या हा प्लॅटफॉर्म तयार झाला असून नाशिक प्रशासनात त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. लवकरच तो संपूर्ण महाराष्ट्रभरात लॉन्च करण्यात येणार आहे. डॉक्टर्स, प्रशासकीय व्यवस्था, पोलीस आणि समाजातील अनेक मंडळी कोरोना विरुद्धची ही लढाई लढत आहेत. आता या व्यापक लढ्याला या प्लॅटफॉर्ममुळे एक अत्यंत वेगळा असा डिजिटल प्रयत्नही जोडला जात आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यात याची फार महत्त्वाची भूमिका असणार असल्याचे महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121