काशी विश्वनाथ मंदिर-मशीद प्रश्नावर न्यायालयाकडून पुन्हा स्थगिती

    14-Mar-2020
Total Views |



gyanvapi_1  H x


१९९१ साली दाखल झाली आहे याचिका


प्रयागराज : वाराणासी न्यायालयाने नुकताच अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मालकी वादासंबंधी स्थगित झालेली सुनावणी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने हि सुनावणी पुन्हा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

काशीतील ज्ञानवापी मशीद ही विश्वनाथाचे मंदिर उधवस्त करून बांधण्यात आली, हा दावा १९९१ साली दाखल करण्यात आला होता. त्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी अंतरिम स्थगिती देऊन सुनावणी रोखली होती. सर्वोच्च न्यायालयाने 'एशियन रिसरफेसिंग रोड वि. सीबीआय' , या याचिकेवर सुनावणी करताना स्थगीती दिलेल्या सर्व याचिकांवर पुन्हा सुनावणी सहा महिन्यानंतर घेतली जावी अशास्वरूपाचा आदेश दिला होता. त्यानुसार मंदिर विश्वस्तांनी दाखल केलेल्या याचीकेवरील सुनावणी पुन्हा सुरु करण्याचे आदेश वाराणासी न्यायालयाला सुनावणी सुरु करण्याची विनंती केली. ४ फेब्रुवारी २०२० रोजी वारणासी दिवाणी न्यायालयाने सुनावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला. अंजुमन इंतेझामिया मस्जिदिने दिवाणी न्यायालयाच्या या निर्णायाला उच्च न्यायालयात आव्हान दिले . त्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुन्हा स्थगितीचे आदेश २६ फेब्रुवारी रोजी दिले आहेत.

मुघल बादशाह औरंगजेबाने १६६४ साली विश्वनाथाचे मंदिर पाडून तिथे मशीद बांधली होती. त्यानुषंगाने १९९१ साली मंदिर विश्वस्तांच्या वतीने हा मूळ दावा दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला होता.

यापूर्वीही अलाहाबाद उच्च न्यायालयानेच संबंधित सुनावणीवर अंतरिम स्थगिती दिली होती. अंजुमन इंतेजामिया यांच्या वतीने 'संबंधित वादाचा निर्णय दिवाणी न्यायालयाकडून केला जाऊ शकत नाही', असा दावा अलाहाबाद उच्च न्यायालयात केला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९९८ साली दिवाणी खटल्यावरील सुनावणीला स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशान्वये सुनावणी सुरु होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र उच्च न्यायलयाने पुन्हा स्थगिती देऊन हा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.