अभिजित-अद्वैतसह रंगणार ‘अळीमिळी गुपचिळी’

    07-Feb-2020
Total Views | 122
zee1_1  H x W:





दुर्वासह मीरा करणार मंचावर धम्माल 

मुंबई : आपण अनेक चॅट शो पाहिले आहेत ज्यात कलाकार मंचावर येऊन दिलखुलास गप्पा मारतात. अशा कार्यक्रमांमधून कलाकारांचे विविध पैलू प्रेक्षकांच्या समोर येतात. झी मराठीने नुकताच प्रेक्षकांसाठी सादर केलेला अळीमिळी गुपचिळी हा चॅट शो ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सज्ज होतात या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. अभिनेता अतुल परचुरे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेत. अभिनेत्री स्नेहलता वसईकर आणि चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पर्वाचा उपविजेता अर्णव काळकुंद्री देखील अतुलला उत्तम साथ देत आहेत.



zee2_1  H x W:


या आठवड्यात अळीमिळी गुपचिळीच्या मंचावर माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय कार्यक्रमाचा लेखक आणि त्यात केडीची भूमिका निभावणार अभिजीत गुरु हा त्याची पत्नी समिधा गुरु आणि त्याच्या मुली सोबत सज्ज होणार आहे. त्याचसोबत या कार्यक्रमातील सौमित्र म्हणजेच अभिनेता अद्वैत दादरकर, त्याची पत्नी भक्ती आणि मुलगी मीरा सोबत या मंचावर हजेरी लावणार आहेत. अभिजित गुरु याची मुलगी सुप्रसिद्ध चित्रपट ‘अशी ही बनवा बनवी’ मधील एक प्रसंग सादर करणार आहे, तर मीराचा निरागसपणा प्रेक्षकांना नक्कीच तिच्या प्रेमात पडणार आहे. मीरा गल्लीबॉय चित्रपटातील एक रॅप सॉंग गाणार आहे. या दोन्ही मुली या मंचावर काय काय धमाल करणार हे आज रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांना पहला मिळणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121