कोकणातील आंबोळगडच्या विनाशकारी प्रकल्पाला स्थगिती; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा निर्णय

    04-Feb-2020   
Total Views | 224
tiger_1  H x W:
 

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला पर्यावरणीय परवानगी देताना आंबोळगडला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे.

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - कोकणातील राजापूर तालुक्यामधील आंबोळगड किनारपट्टीवर एका खासगी कंपनीने प्रस्तावित केलेला कोळसा उर्जा आणि बंदर प्रकल्पाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्थगिती दिली आहे. आंबोळगड ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध असल्याने ठाकरेंनी आज त्यांची भेट घेऊन हा निर्णय घेतला. 'केंद्रीय पर्यावरण मंत्रालया'ने जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला पर्यावरणीय परवानगी देताना आंबोळगडला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित केले आहे.
 
 
 

tiger_1  H x W: 
 
'आय लाॅग पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने आंबोळगड किनारपट्टीवर २०१४ साली कोळसा वाहतूकीसाठी जेट्टी आणि कोळसा उर्जा प्रकल्प प्रस्तावित केला होता. यासंदर्भातील पर्यावरणीय परिणाम अभ्यास हैद्राबादच्या 'भगवती आॅनलाॅजी प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने केला होता. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) कोकणातील पर्यावरणीय संवदेनशील क्षेत्रांच्या अभ्यासावेळी आंबोळगडमधील सागरी जैवविविधतेची नोंद केली होती. या नोंदी कंपनीने तश्याच उचलून प्रकल्पासाठी तयार केलेल्या पर्यावरणीय परिणाम अहवालात टाकल्या. यावर 'बीएनएचएस'ने आक्षेप नोंदवून त्याची तक्रार 'नाबेड'कडे केली होती. शिवाय हा प्रकल्पाला पर्यावरणीय आणि 'सीआरझेड' परवानगी मिळालेली नसतानाही कंपनीने डिसेंबर महिन्यापासून प्राथमिक कामांना सुरुवात केली. याबाबात 'बीएनएचएस'ने मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंना २४ जानेवारी रोजी पत्र लिहून तक्रार केली होती. बेकायदशेरित्या उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला ग्रामस्थांचाही विरोध होता.
 
 
 

tiger_1  H x W: 
आज ग्रामस्थांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी या प्रकल्पाला स्थगिती देऊन पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांना या प्रकल्पाचा आढावा घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती 'जनहक्क सेवा समिती'चे अध्यक्ष सत्यजित चव्हाण यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. 'केंद्रीय पर्यावरण मंत्रालया'ने जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला पर्यावरणीय परवानगी देताना उपाययोजात्मक बाब म्हणून आंबोळगड आणि कशेळीच्या किनाऱ्याला पर्यावरणीय संवदेनशील क्षेत्र म्हणून घोषित केले होते. तसेच याठिकाणी कोणताही विकास केला जाणार नसल्याचे नमूद केले होते, अशी माहिती 'बीएनएचएस'चे संचालक डाॅ. दिपक आपटे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. यासाठी आम्ही केलेल्या 'जैतापूर जैवविविधता संवर्धन अहवाला'चा आधार घेण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही अभिनंदन करत असून या प्रकल्पाला स्थगिती देण्याऐवजी तो रद्द केल्यास अधिक उचित ठरेल, असेही आपटे म्हणाले. 'बीएनएचएस'ने या अभ्यासाअंती आंबोळगड येथील खडकाळ-वाळूकामय किनारे आणि सडा परिसर जैवविविधता दृष्टीने संवदेनशील असल्याचे नमूद केले होते.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121