नमस्ते ट्रम्प !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020   
Total Views |


namaste trump_1 &nbs


भारतात आजवर अनेक देशांचे प्रमुख येऊन गेलेत. अनेक प्रतिनिधी मंडळांचे दौरे झालेत. पण ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम माध्यमांसाठी लक्षवेधी ठरतो आहे. त्यामागील एक कारण भारतीय मानसिकतेतील अमेरिकेचे स्थान, हे आहेच. मात्र अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची पार्श्वभूमी ट्रम्प यांच्या दौर्‍याला आहे.


खरंतर आपल्या देशात परदेशाच्या प्रतिनिधींनी येणे हे देशासाठी कौतुकास्पद. एखाद्या देशाच्या घटनात्मक प्रमुखाने आपल्या देशाला भेट देणे हा सोहळाच. ‘अतिथी देवो भव’ अशी संस्कृती परंपरा असलेल्या देशाने तर अशा प्रमुखांचे, प्रतिनिधी मंडळांचे स्वागत केलेच पाहिजे. माणूसपणाच्या निकषांवर संबंधित व्यक्ती, देश कसेही असले तरी त्यांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले गेलेच पाहिजे. त्याचे कारण एका देशाचे प्रतिनिधी या नात्याने ते आपल्या देशात येत असतात. सध्या भारतभर चर्चा सुरू आहे ती ट्रम्प यांच्या भेटीची. तसे भारतात आजवर अनेक देशांचे प्रमुख येऊन गेलेत. अनेक प्रतिनिधी मंडळांचे दौरे झालेत. पण ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम माध्यमांसाठी लक्षवेधी ठरतो आहे. त्यामागील एक कारण भारतीय मानसिकतेतील अमेरिकेचे स्थान, हे आहेच. मात्र अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची पार्श्वभूमी ट्रम्प यांच्या दौर्‍याला आहे.



अमेरिकेतील भारतीय वंशाचे मतदार निवडणुकीच्या गणितात मोठी भूमिका बजावतात
. अनेक वर्षे चांगले नेतृत्व न मिळाल्यामुळे भारत म्हणून त्यांच्या अस्मितेला साद देणारे कुणी नव्हते. आज मोदींच्या निमित्ताने हे सगळे ‘भारत’ म्हणून अभिव्यक्ती होऊ लागले आहेत. त्यांच्या विचारांना, दृष्टिकोनाला हा एक नवा पैलू जोडला गेला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मतपेटीवर अधिराज्य गाजवू इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी भारत महत्त्वाचा असतो. ट्रम्प यांची भेट व त्या भेटीच्या सर्वाधिक चर्चा होण्यामागे ही राजकीय कारणेही आहेत.



मोदींवर टीका करण्यासाठी टपून बसलेले सगळेच
‘नमस्ते ट्रम्प’च्या निमित्ताने पुन्हा सक्रिय झाले. ‘नमस्ते ट्रम्प’ साठी खर्च किती, व्यवस्था, सुरक्षा या सगळ्यांचीच चर्चा माध्यमातून होते आहे. ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्याचा मुंबई दौरा झाला होता. त्यावेळेसही व्यवस्थेच्या दृष्टीने कठोर निर्णय घेण्यात आले होते. महाराष्ट्रातील मच्छीमारांना समुद्रात बोटी नेण्यापासून बंदी घालण्यात आली होती. ओबामा यांच्या सुरक्षेसाठी तत्कालीन सरकारने अब्ज रुपये खर्च करून काही विशेष चारचाकी बनवून घेतल्या होत्या. ओबामा यांनी केलेल्या कोळीडान्सची चर्चा तेव्हा माध्यमे करीत होती. तत्कालीन सरकारवर टीका करण्यासाठी आपल्या देशातील बुद्धिवंत, माध्यमांनी त्या भेटीचे निमित्त केले नव्हते. आज ‘नमस्ते ट्रम्प’ च्या निमित्ताने जे घडते आहे, ते आपल्या देशाच्या प्रतिमेच्या दृष्टीने दुर्दैवी म्हणावे लागेल.



मोदींची खिल्ली उडवण्यासाठी एका झोपडपट्टीलगत उभारण्यात आलेल्या भिंतीची चर्चा केली जाते
. ज्यांचा उद्देश केवळ थट्टामस्करी करणे आहे, त्या कमरावीरांना हे मुद्दे उत्तेजक ठरू शकतात. मात्र, ती भिंत उभारणारे प्राधिकरण कोणते आहे, त्याची निविदा सूचना केव्हाची आहे, याचा संदर्भ द्यायला कोणी तयार नाही. झोपडपट्टीलगत भिंती उभारण्याचे काम मुंबई महापालिकेनेसुद्धा केले आहेच. गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या कथित भिंतीमागे ‘नमस्ते ट्रम्प’ चेच प्रयोजन आहे, याची खात्री कोणीही देऊ शकलेलं नाही. त्यातूनही दौर्‍याचा मार्ग व प्रवास बदलणे ज्यांना शक्य आहे ते झोपडपट्टी दिसू नये यासाठी भिंत का उभारतील ? त्याऐवजी अन्य उपाययोजना करणे सरकारला सहज शक्य होते. पण ज्यांची बुद्धी मोदींच्या प्रतिमभंजनात अडकली आहे, त्यांना असे प्रश्न पडणार नाहीत. त्यांच्याकरिता मोदींवर टीका करायला मिळणारा प्रत्येक मुद्दा विज्ञानातील नव्या शोधाइतकाच महत्त्वाचा व दुर्मीळ असतो.



काश्मीर
, सीएए अशा देशांतर्गत विषयांचा ऊहापोह मोदीविरोधकांनी करून पाहिला. आपल्या देशातील अंतर्गत विषय अशाप्रकारे चव्हाट्यावर मांडल्यामुळे आपण मोदींचे नुकसान करीत आहोत की आपल्या देशाचे, याचा विचार विरोधी पक्षांनी केला पाहिजे. ट्रम्प यांचा दौरा भारतभेटीचा आहे, मोदीभेटीचा नाही. त्यातूनही ट्रम्प हे डोनाल्ड ट्रम्प अशी व्यक्ती म्हणून आलेले नाहीत. एका सार्वभौम देशाचे लोकनिर्वाचित प्रमुख म्हणून आले आहेत. त्यामुळे आता जे सुरू आहे, तो दोन देशांचा कार्यक्रम समजला पाहिजे. पाकिस्तानचे प्रमुख भारत दौर्‍यावर येणार म्हणून स्वातंत्र्यवीरांना तुरुंगात टाकण्याचे पायंडे पाडणारे सरकार या देशावर राज्य करून गेलेत. तसे भीषण काही सरकारने करण्याचा अट्टहास केल्यास राज्यकर्त्यांना टीकेचे लक्ष्य करणे योग्य ठरेल.

@@AUTHORINFO_V1@@