वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याने पाकिस्तानचे नागरीकत्व मिळवण्यासाठी केला अर्ज
मुंबई : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि कॅरेबियन संघाला दोन टी-२० वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधाराला पाकिस्तानचे नागरिकत्व हवे आहे. दिग्गज अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमी पाकिस्तानचे नागरिकत्व मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी सॅमीने अर्जही केला आहे. त्याच्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सॅमी सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी संघाचा कर्णधार असून आयपीएलमध्ये सॅमी सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारल्यास सॅमीला आयपीएल खेळता येणार नाही.
पाकिस्तान सुपर लीगचे पाचवे हंगाम खेळले जात आहे., दुसर्या आवृत्तीचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये खेळला गेला. त्यावेळी डॅरेन सॅमीने पीएसएल टीम पेशावर जल्मीचे नेतृत्व केले आणि संघाला जेतेपद मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॅरेन सॅमीपूर्वी कोणतेही परदेशी खेळाडू पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास तयार नव्हते, परंतु सॅमी तिथे जाऊन क्रिकेट खेळला. २००९ मध्ये श्रीलंकेच्या टीमच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट थांबविण्यात आले होते.
पाकिस्तानी माध्यमांनुसार पेशावर झल्मी संघाचे मालक जावेद आफ्रिदी म्हणाले की, ‘डॅरेन सॅमी हा त्याच्या संघाचा अविभाज्य भाग आहे आणि आमच्या विनंतीमुळे त्याने पाकिस्तानच्या नागरिकतेसाठी अर्ज केला आहे.’