भटकंती कट्टा सांगणार ‘पाणथळीं’चे महत्त्व!

    21-Feb-2020
Total Views | 88
bhatkanti katta_1 &n



ठाणे : नुकताच जगभरात ‘पाणथळ जागा संवर्धन दिन’ साजरा केला गेला. याच निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता, मंगला शाळा, कोपरी ठाणे पूर्व येथे भटकंती कट्टा ठाण्याच्या माध्यमातून पाणथळ ह्या विषयावर सीमा हर्डीकर मार्गदर्शन करणार आहेत.


महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे ७२० कि.मी. लांब किनारपट्टीपैकी मुंबईच्या वाट्याला अंदाजे ११४ कि.मी. किनारी क्षेत्र आले आहे. वालुकामय, खडकाळ, कांदळवन-दलदल जमीन, खाडी, कोंडपाणी क्षेत्र, नदी, प्रवाळ भिंती, मानवनिर्मित तलाव, मिठागरे, जलाशये, धरणे ही पाणथळ क्षेत्रे आहेत. राज्यात गेल्या काही वर्षांत पाणथळ जागांना सरकार-दरबारी पडिक जमिनी असे मानून त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. १५ वर्षांपूर्वी उरण येथे पाणथळ जागांचा बळी घेण्यास सर्वप्रथम सुरुवात झाली. तोच कित्ता ठाणे खाडीच्या क्षेत्रात ठिकठिकाणी अवलंबण्यात आला. त्यामुळेच इराणच्या रामसर परिषदेतील मानकाचा दर्जा मिळण्याची क्षमता असलेल्या ठाणे खाडीच्या पाणथळ क्षेत्राची आजची अवस्था मात्र विदारक झाली आहे. पण ह्या अनावस्थेचे मूळ कारण लोकांना पाणथळ जागा म्हणजे काय त्याची माहिती नसणे. ह्या जागेचे फायदे, तिथल्या वनस्पती, पक्षी, प्राणी या साऱ्याचे माहीती या निमित्ताने भटकंती कट्टा ठाणे येथे उलगडणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121