सलमानची नवी ‘ब्राझिलियन’ अभिनेत्री!

    15-Feb-2020
Total Views | 103
salman khan_1  




सलमान खान करणार ‘या’ नव्या चेहऱ्याला लाँच


मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने आतापर्यंत अनेक स्टारकिड्सना आणि नव्या चेहऱ्यांना अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याची संधी दिली. सलमानच्या या दिलदार वृत्तीमुळे त्याला ‘दबंग’ शिवाय बॉलीवूडमधला गॉडफादर म्हणून देखील ओळखले जाते. अनेक नवख्या कलाकारांसाठी त्याने बॉलिवूडचे दालन उघडे करून दिले आहे. स्नेहा उल्लाल, भूमिका चावला, ऐश्वर्या राय, झरीन खान, डेजी शहा, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, अथिया शेट्टी, आणि सई मांजरेकर हे नवे चेहेरे सलमानमुळे चित्रपटसृष्टीला परिचित झाले. या यादीत आता आणखी एका नव्या चेहऱ्याची भर पडणार आहे. सलमान आता एका ब्राझीलियन अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये दाखल करण्यासाठी सज्ज झाला आहे.






लॅरिसा बोन्सी असे या ब्राझीलियन अभिनेत्रीचे नाव असून, यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचा अधिकृत खुलासा सलमानने केलेला नाही. परंतु सलमानसोबत एक फोटो लॅरिसाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये सलमान खानसोबत काम करण्याची संधी मला मिळाल्यामुळे फार आनंदी असल्याचे म्हटले आहे. मात्र सलमान कडून अद्याप काहीच माहिती आली नसल्याने हा नवा चेहरा नेमक्या कोणत्या चित्रपटात आणि कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता निर्माण झाली आहे.

सलमान सध्या त्याच्या आगामी ‘राधे’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. सलमानसोबत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना अभिनेत्री दिशा पटनी दिसणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121