अंबरनाथकरांचा हक्काचा माणूस

    09-Dec-2020   
Total Views |

सर्जेराव हरिश्चंद्र माहूर


संपूर्ण मानवजातीवर आलेल्या महामारीच्या संकटात जात-पात-धर्म विसरून तन-मन-धन अर्पण करून सेवा देणारे अंबरनाथचे सर्जेराव माहूरकर. त्यांनी समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून गंभीर संकटाशी खंबीरपणे सामना करण्याचे ठरविले होते. तातडीने जनजागृती मोहीम त्यांनी सुरू केली. आरोग्याबद्दल नागरिकांना जागरूक करण्याची जबाबदारी पार पाडली. तेव्हा, त्यांनी केलेल्या या व्यापक सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...


सर्जेराव हरिश्चंद्र माहूरकर
राजकीय पक्ष : भाजप
प्रभाग : प्रभाग ४५, अंबरनाथ नगर परिषद
संपर्क क्र. : ९४२२४८०७०५


अंबरनाथमध्ये कोरोनारूपी संकट डोके वर काढत होते. दररोज वाढणारे रुग्णांचे प्रमाण यात नागरिकांना धीर देण्याची आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज होती. रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करणे, स्वच्छता पाळणे आदी संदेश देणारी व्यापक जनजागृती मोहीम त्यांनी हाती घेतली. वृत्तपत्रे, फलक, भित्तीपत्रे, डिजिटल माध्यमांद्वारे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने एक नेटवर्क उभे केले. आपल्या प्रभागातील नागरिकांशी कोरोना महामारीच्या काळात थेट संपर्क ठेवून एखाद्या योद्ध्याप्रमाणे परिस्थिती हाताळली. मास्कवाटप, व्हेपोरायझरवाटप, सॅनिटायझरवाटप, निर्जंतुकीकरण, अन्नधान्यवाटप, मजुरांना जेवणवाटप आदी मदत त्वरित पोहोचविण्याची व्यवस्था केली होती. आपल्या विभागातील एकूण ४५० नागरिकांना वैद्यकीय शिबिराद्वारे चाचणी, तपासणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली. एकूण १,५०० कुटुंबांना व्हेपोरायझरचे वाटप केले. ‘लॉकडाऊन’च्या काळात अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी नागरिकांना ५६० कुटुंबीयांना प्रत्येकी नऊ किलोचे किट्स वाटले. त्यासोबतच आपल्या विभागात त्यांनी दहा हजार मास्कचे वाटप केले. तितक्याच प्रमाणात सॅनिटायझरचेही वाटप केले. त्याकाळात बाजारात जाणवणारा मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा पाहता ही मदत महत्त्वाची ठरली. ज्या ज्या व्यक्तीला जी मदत लागेल, ती पोहोचविण्याची व्यवस्था माहूरकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली.


‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यानंतर काही काळातच इतर राज्यांतील मजुरांच्या परतण्याचा प्रश्न निर्माण होत होता. विभागातील सर्व मजुरांना सुखरूप पोहोचविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लागेल ती मदत त्यांना केली. त्यांना श्रमिक रेल्वेतून सुखरूप घरी पाठविले. जितके मजूर या ठिकाणी राहण्यासाठी होते त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोयही त्यांनी केली. दररोज २०० मजुरांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली होती. महत्त्वाचे म्हणजे, मजुरांना परतण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड आदी ओळखपत्रांची गरज भासत होती. नावातील बदल, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, या सोयींकरिता ‘लॉकडाऊन’ निर्बंध शिथिल झाल्यानंतर आधार केंद्र सुरू केले. ज्या ज्या व्यक्तींना महत्त्वाच्या शासनाच्या कागदपत्रांची गरज होती ती उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शनही केले. जवळच्या आदिवासी पाड्यांना भेटी देऊन तिथल्या नागरिकांच्याही समस्या जाणून घेतल्या. पाड्यावरील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाबद्दल जनजागृती करून सर्वांना अन्नधान्याचे किट्स, मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले.या सगळ्यात अत्यंत महत्त्वाची मदत ठरली ती म्हणजे, नागरिकांना ज्या गोष्टीची भीती होती त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न माहूरकर यांनी केला. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याच्यावर होणारा रुग्णालयातील खर्च पाहून सार्‍यांना धडकी भरत असे. गोरगरीब कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी माहूरकर यांनी अनोखी संकल्पना मांडली. आपल्या वॉर्डात ‘कोरोना रक्षक विमा पॉलिसी’ची सुरुवात त्यांनी आपल्या माध्यमातून केली. याअंतर्गत कोरोना रुग्णाला किमान ५० हजारांपर्यंत मोफत उपचार खासगी रुग्णालयात मिळू शकणार होते. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत एकूण ६५० जणांचा विमा माहूरकर यांनी उतरविला होता. त्यांच्या या योजनेला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हा उपक्रम एक आदर्श म्हणून अनेकांनी आपणहून सोसायट्या, मंडळे यांच्यात सुरू ठेवला.


सर्जेराव हरिश्चंद्र माहूर


घरातूनच समाजसेवेचे संस्कार मला लाभल्याने आज इतक्या गंभीर संकटात धीराने, नेटाने समाजाची सेवा करू शकलो. आईवडिलांनी दिलेली समाजाला उपयोगी पडण्याची शिकवण मला कामी आली.



कोरोनाला हरविण्याचे साधे आणि सरळ मार्ग आहेत हे ओळखून माहूरकर यांनी ‘सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. आपल्या प्रभागात महात्मा गांधी जयंती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण सोसायटीचे निर्जंतुकीकरण, कुटुंबीयांची देखभाल आणि व्यवस्था पाहिली होती. हातावर पोट असणार्‍या कुटुंबांची व्यथा पाहून माहूरकर अस्वस्थ होत. उपाशी झोपणार्‍या मुलांच्या डोळ्यातील अश्रू त्यावेळेस आपलेपणाने पुसण्याचे काम त्यांनी केले. आपला ‘हक्काचा माणूस’ म्हणून या गरजू कुटुंबांनी त्यांना साद घातली. या कुटुंबांची सर्व व्यवस्था माहूरकर यांनी करून दिली. घरकाम करणार्‍या माता-भगिनींना दिलासा मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केला. सर्जेराव माहूरकर हे स्वतः २१ वर्षे प्रशासकीय सेवेत असल्याने त्यांना यंत्रणेतील खाचखळगे माहिती होते. ‘लॉकडाऊन’मध्ये या यंत्रणेवर आलेला ताणही त्यांनी ओळखला होता. सरकारची जबाबदारी आहेच; मात्र आपले स्वतःचे दायित्व म्हणून काहीतरी खारीचा वाटा उचलण्याचा निर्धार त्यांनी केला होता. याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यांची मदत स्वीकारणारे सर्वच जण आभार मानत त्यांना आशीर्वाद देतात. जगावर ओढावलेल्या या संकटात प्रत्येकाने इतरांसाठी धर्म, पंथ, जात किंवा इतर भेदाभेद विसरून मदत करावी, असे आवाहन त्यांनी आपल्या पुढील पिढीला केले आहे. समाजाला फूल ना फुलाची पाकळी मदत म्हणून करणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, असे त्यांचे मत आहे.

या संपूर्ण मदतकार्यात माहूरकर यांचे सहकारी-कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून नागरिकांच्या पाठीशी उभे होते. भगवान भाई सोलंकी, जॉन अ‍ॅलेक, कैलास जाधव, विजय जाधव, प्रदीप पाटील, किरण गायकवाड, महेश तावरे, निर्मल जैन, संजय सिन्हा, श्रेया झेमसे, उज्ज्वला मंगेश कदम, आशा वसंत शाह आदी सहकारी कोरोनाचे आव्हान पेलून माहूरकर यांच्यासोबत या सर्व कार्यात सहभागी झाले. पक्षाकडूनही हातभार लाभला. “या सर्वांच्या सहकार्याशिवाय ही मदत अशक्य होती,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या सर्व मदतकार्यात कुटुंबीयांचेही पाठबळ लाभले. बाहेर कोरोनारूपी महामारी वाढत असताना आणि जनतेची सेवा करायला जात असताना आपल्या कुटुंबाला विश्वासात घेणेही तितकेच गरजेचे आहे, त्यानुसार माहूरकर कुटुंबीय कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अंबरनाथमध्ये कोरोनारूपी संकट डोके वर काढत होते. दररोज वाढणारे रुग्णांचे प्रमाण यात नागरिकांना धीर देण्याची आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज होती. रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करणे, स्वच्छता पाळणे आदी संदेश देणारी व्यापक जनजागृती मोहीम त्यांनी हाती घेतली. वृत्तपत्रे, फलक, भित्तीपत्रे, डिजिटल माध्यमांद्वारे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने एक नेटवर्क उभे केले.



आपल्या प्रभागातील नागरिकांशी कोरोना महामारीच्या काळात थेट संपर्क ठेवून एखाद्या योद्ध्याप्रमाणे परिस्थिती हाताळली. मास्कवाटप, व्हेपोरायझरवाटप, सॅनिटायझरवाटप, निर्जंतुकीकरण, अन्नधान्यवाटप, मजुरांना जेवणवाटप आदी मदत त्वरित पोहोचविण्याची व्यवस्था केली होती.आपल्या विभागातील एकूण ४५० नागरिकांना वैद्यकीय शिबिराद्वारे चाचणी, तपासणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली. एकूण १,५०० कुटुंबांना व्हेपोरायझरचे वाटप केले. ‘लॉकडाऊन’च्या काळात अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी नागरिकांना ५६० कुटुंबीयांना प्रत्येकी नऊ किलोचे किट्स वाटले. त्यासोबतच आपल्या विभागात त्यांनी दहा हजार मास्कचे वाटप केले. तितक्याच प्रमाणात सॅनिटायझरचेही वाटप केले. त्याकाळात बाजारात जाणवणारा मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा पाहता ही मदत महत्त्वाची ठरली. ज्या ज्या व्यक्तीला जी मदत लागेल, ती पोहोचविण्याची व्यवस्था माहूरकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली. ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यानंतर काही काळातच इतर राज्यांतील मजुरांच्या परतण्याचा प्रश्न निर्माण होत होता. विभागातील सर्व मजुरांना सुखरूप पोहोचविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लागेल ती मदत त्यांना केली. त्यांना श्रमिक रेल्वेतून सुखरूप घरी पाठविले. जितके मजूर या ठिकाणी राहण्यासाठी होते त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोयही त्यांनी केली. दररोज २०० मजुरांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली होती. महत्त्वाचे म्हणजे, मजुरांना परतण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड आदी ओळखपत्रांची गरज भासत होती. नावातील बदल, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, या सोयींकरिता ‘लॉकडाऊन’ निर्बंध शिथिल झाल्यानंतर आधार केंद्र सुरू केले. ज्या ज्या व्यक्तींना महत्त्वाच्या शासनाच्या कागदपत्रांची गरज होती ती उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शनही केले. जवळच्या आदिवासी पाड्यांना भेटी देऊन तिथल्या नागरिकांच्याही समस्या जाणून घेतल्या. पाड्यावरील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाबद्दल जनजागृती करून सर्वांना अन्नधान्याचे किट्स, मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले.


या सगळ्यात अत्यंत महत्त्वाची मदत ठरली ती म्हणजे, नागरिकांना ज्या गोष्टीची भीती होती त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न माहूरकर यांनी केला. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याच्यावर होणारा रुग्णालयातील खर्च पाहून सार्‍यांना धडकी भरत असे. गोरगरीब कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी माहूरकर यांनी अनोखी संकल्पना मांडली. आपल्या वॉर्डात ‘कोरोना रक्षक विमा पॉलिसी’ची सुरुवात त्यांनी आपल्या माध्यमातून केली. याअंतर्गत कोरोना रुग्णाला किमान ५० हजारांपर्यंत मोफत उपचार खासगी रुग्णालयात मिळू शकणार होते. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत एकूण ६५० जणांचा विमा माहूरकर यांनी उतरविला होता. त्यांच्या या योजनेला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हा उपक्रम एक आदर्श म्हणून अनेकांनी आपणहून सोसायट्या, मंडळे यांच्यात सुरू ठेवला. कोरोनाला हरविण्याचे साधे आणि सरळ मार्ग आहेत हे ओळखून माहूरकर यांनी ‘सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. आपल्या प्रभागात महात्मा गांधी जयंती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण सोसायटीचे निर्जंतुकीकरण, कुटुंबीयांची देखभाल आणि व्यवस्था पाहिली होती. हातावर पोट असणार्‍या कुटुंबांची व्यथा पाहून माहूरकर अस्वस्थ होत. उपाशी झोपणार्‍या मुलांच्या डोळ्यातील अश्रू त्यावेळेस आपलेपणाने पुसण्याचे काम त्यांनी केले. आपला ‘हक्काचा माणूस’ म्हणून या गरजू कुटुंबांनी त्यांना साद घातली. या कुटुंबांची सर्व व्यवस्था माहूरकर यांनी करून दिली. घरकाम करणार्‍या माता-भगिनींना दिलासा मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केला.

सर्जेराव माहूरकर हे स्वतः २१ वर्षे प्रशासकीय सेवेत असल्याने त्यांना यंत्रणेतील खाचखळगे माहिती होते. ‘लॉकडाऊन’मध्ये या यंत्रणेवर आलेला ताणही त्यांनी ओळखला होता. सरकारची जबाबदारी आहेच; मात्र आपले स्वतःचे दायित्व म्हणून काहीतरी खारीचा वाटा उचलण्याचा निर्धार त्यांनी केला होता. याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यांची मदत स्वीकारणारे सर्वच जण आभार मानत त्यांना आशीर्वाद देतात. जगावर ओढावलेल्या या संकटात प्रत्येकाने इतरांसाठी धर्म, पंथ, जात किंवा इतर भेदाभेद विसरून मदत करावी, असे आवाहन त्यांनी आपल्या पुढील पिढीला केले आहे. समाजाला फूल ना फुलाची पाकळी मदत म्हणून करणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, असे त्यांचे मत आहे.या संपूर्ण मदतकार्यात माहूरकर यांचे सहकारी-कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून नागरिकांच्या पाठीशी उभे होते. भगवान भाई सोलंकी, जॉन अ‍ॅलेक, कैलास जाधव, विजय जाधव, प्रदीप पाटील, किरण गायकवाड, महेश तावरे, निर्मल जैन, संजय सिन्हा, श्रेया झेमसे, उज्ज्वला मंगेश कदम, आशा वसंत शाह आदी सहकारी कोरोनाचे आव्हान पेलून माहूरकर यांच्यासोबत या सर्व कार्यात सहभागी झाले. पक्षाकडूनही हातभार लाभला. “या सर्वांच्या सहकार्याशिवाय ही मदत अशक्य होती,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या सर्व मदतकार्यात कुटुंबीयांचेही पाठबळ लाभले. बाहेर कोरोनारूपी महामारी वाढत असताना आणि जनतेची सेवा करायला जात असताना आपल्या कुटुंबाला विश्वासात घेणेही तितकेच गरजेचे आहे, त्यानुसार माहूरकर कुटुंबीय कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.