शेतकरी दादा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |
vikram nagare _1 &nb


कोरोना महामारी आणि ‘लॉकडाऊन’मध्ये संपूर्ण जग थांबले होते. या काळात बळीराजा कायम राबत होता. त्याला आधार देण्याची गरज होती. आस्मानी संकटही डोक्यावर उभे होते. शेतमाल जागीच सडून जातो की काय, अशी भीती होतीच. याच वेळी भाजपचे नाशिक कामगार आघाडी प्रदेश सचिव विक्रम नागरे यांनी शेतकर्‍याचा माल थेट गरजूंपर्यंत पोहोचवून एक नवा आदर्श जगासमोर ठेवला. त्यांच्या मदतकार्याचे हे मॉडेल एक आदर्श ठरत आहे.


विक्रम सुदाम नागरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : कामगार आघाडी, प्रदेश सचिव
प्रभाग क्र. : १०, नाशिक मनपा
संपर्क क्र. : ९०१११०२००७
 

कोरोना महामारीमुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला. मुंबई-पुण्याहून पायी चालत जाणार्या मजुरांसाठी नाशिक हे तसे उसंत घेण्याचे ठिकाण होते. इतर जिल्ह्यांतून येणारे हे लोंढे पाहता, स्थानिकांमध्ये एक तणाव असणे स्वभाविक होते. मात्र, तीही माणसे आहेत, आपलीच आहेत, या भावनेने नाशिककरांनी त्यांची राहण्याची आणि विश्रांतीची व्यवस्था केली होती. विक्रम सुदाम नागरे यांनी त्यांच्या विभागात सुन्न रस्त्यांवर चालणार्‍या मजुरांची व्यवस्था करण्याची ठरविली होती. मात्र, मदत पोहोचविताना आलेले भयानक अनुभव पाहून त्यांना दाटून येत होते.
 
 

 

मुंबई-पुण्याहून पायी येणार्‍या मजुरांची पायताणे चालता चालता पार झिजून गेली होती. माथ्यावर सूर्य तळपत असताना लाखोंच्या संख्येने हे मजूर स्थलांतर करत होते. मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करणारे बरेचसे जण होते. मात्र, या गटांतील मजुरांपैकी प्रत्येकाला एक समस्या समान होती. हजारो किमी अंतर पायी चालल्यावर पायात वहाण टिकली नाही. तुटलेल्या चपला फेकून देत तशीच वाट तुडवत ही मंडळी आपल्या घराकडे निघाली होतीत्यातच कोरोनाची भीती कायम होती. कारण, आकडेवारी वाढतच चालली होती. त्यामुळे काही केल्या घर गाठायचे होते. रणरणत्या उन्हात रस्ते आग ओकत होते. त्यावरून चालणार्‍याचे पाय होरपळून निघत होते. चालणे म्हणजे, आयुष्याची एक कसरत होऊन बसली होती. भोवळ येऊन मूर्च्छित येऊन पडणे, पायात वहाण नसल्याने पायाला फोड, अशा तक्रारी सुरूच होत्या. त्यात टाहो फोडणार्‍या लहान मुलांच्या डोळ्यातील पाणीही सुकून जात होते. नागरे यांना ही परिस्थिती पाहवेना. या मजुरांना चपला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एकूण २,८०० मजुरांना मोफत चपलावाटप कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आणि शेकडो मैल चालणार्‍या या मजुरांचे आशीर्वाद त्यांना लाभले. भाजणार्‍या पायांना चपलेचा स्पर्श जाणविल्यावर मजुरांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येत होते. मजुरांना घरी पोहोचविण्यातील हा खारीचा वाटा महत्त्वाचा ठरला होता.

 
 
 

आता वेळ होती शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येण्याची. स्वतः शेतकरी असल्याने बळीराजाची व्यथा काय असते, याची जाणीव नागरे यांना पूर्वीपासूनच होती. ‘लॉकडाऊन’मुळे शेतकर्‍यांच्या शेतातील माल हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्यावेळी पोहोचत नव्हता. त्यातच रणरणत्या उन्हामुळे भाजीपालाही करपून जात होता. ‘लॉकडाऊन’मध्ये वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध होत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास निघून जातो की काय, अशी त्यांची परिस्थिती होती. नाशिकच्या शेतकर्‍यांची ही व्यथा नागरे यांना समजली. यावर एक भन्नाट कल्पना त्यांनी शोधून काढली. त्यांच्या आजूबाजूलाही ‘लॉकडाऊन’मुळे भाजीपाला पोहोचू शकत नव्हता. शेतकर्‍याचा माल बाजारभावाने विकत घेऊन या सोसायट्यांमध्ये मोफत वाटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बळीराजाच्या मदतीला एक शेतकरी धावून गेला होता. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आजूबाजूच्या गावातील भाजीपालाविक्रेत्या शेतकर्‍यांकडून माल उचलला.

 
vikram nagare _1 &nb

 

आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबीय. त्यामुळे अन्नधान्य पिकवणे, काळ्या आईची सेवा करणे हाच आमचा धर्म... या सगळ्यातून पुढे येत माझ्या आई, इंदुबाई नागरे यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन मी समाजकार्यात उतरलो. त्यांच्या मार्गदर्शनात ‘कोविड’ काळातही मी गरजूंपर्यंत पोहोचू शकलो. भविष्यातही मला मदतकार्य करण्यासाठी बळ मिळो, ही प्रार्थना!

 
 

प्रतिकुटुंब १५ किलो भाजीपाल्याचे किट तयार करून १४ हजार कुटुंबांना वाटप केले. या कुटुंबांचा, १५ दिवसांच्या भाजीपाल्याचा आणि मुख्यत्वे शेतकर्यांच्या मालाचा प्रश्न नागरे यांनी सोडवून एका दगडात दोन पक्षी मारले होते. यानंतर जवळपास १५ दिवस नागरे यांचा फोन आभार व्यक्त करण्यासाठी खणखणत होता. गरज ओळखून त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे सर्वांनी कौतुक केले. पुढे काही दिवस नागरे यांचा आदर्श घेत अनेकांनी याच प्रकारे मदत केली. भाजप कार्यालय, रा. स्व. संघ कार्यालय यांच्याकडून मिळणार्‍या निर्देशांनुसार सर्वतोपरी मदत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले.

 
 

‘लॉकडाऊन’मध्ये अनेकांचा कामधंदा गेला होता. हातावर पोट असणार्‍यांची आबाळ झाली होती. त्यांच्या जेवणाचाही प्रश्न होता. शिवाय झोपडपट्टी, स्थलांतरित मजूर यांचेही प्रश्न नागरे यांच्यापाशी येत होते. या सर्वांना काही ना काही मदत पोहोचवायची होती. त्यानुसार नागरे यांनी त्यांच्या शेतात पिकविलेला १०० पोती गहू त्यांनी किट्स तयार करून वाटप केला. झोपडपट्ट्यांतील रहिवासी, पायी चालत जाणारे मजूर यांच्यापर्यंत त्यांनी ही मदत पोहोचविली. ‘महाबली शिवशाही प्रतिष्ठानया त्यांच्या संस्थेमार्फत या सर्व कार्यासाठी हातभार लावण्यात आला. याशिवाय रवींद्र पावले, अमोल इगे, रामेश्वर नागरे, राज पाटील, अनिल शर्मा आदी सहकारी आणि इतर धडाडीचे कार्यकर्ते आदींचा सहभाग होता. आजही त्यांच्यामार्फत विभागामध्ये निर्जंतुकीकरण करणे, कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, रुग्णालयांची अवाजवी बिले कमी करून देण्यासाठी प्रयत्न करणे, कोरोनासंदर्भातील जनजागृती करणे, धूरफवारणी करणे आदी कामेही निरंतर सुरूच आहेत. पालिकेच्या माध्यमातून दैनंदिन प्रशासकीय कामे मार्गी लावणे, लोकांच्या समस्या सोडविणे आदी कार्य सुरूच होते. सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यावरही त्यांनी भर दिला.

 
 

या कार्यात आणखी महत्त्वाचा सहभाग लाभला तो म्हणजे त्यांच्या मातोश्री नगरसेविका इंदुबाई नागरे यांचा. पालिकेच्या माध्यमातून आपल्या विभागात लागेल ती मदत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. घरातूनच समाजकार्याचा वारसा असल्याने कोरोनाकाळातही स्वतःला त्यांनी झोकून दिले. आपल्या विभागात लक्षणे आढळलेल्या संशयित रुग्णांपैकी ७०० ते ८०० जणांची कोरोना चाचणी त्यांनी मोफत केली. त्यापैकी जवळपास २५० जणांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. पालिकेच्या माध्यमातून या सर्वांची व्यवस्थाही त्यांनी करून दिली. संकटात धावून येणारा आपला हक्काचा माणूस, अशी ओळख त्यांनी पूर्वीच कमावली होती. मात्र, कोरोनाच्या प्रसंगात त्यांनी आपल्या दायित्वाचे पालन केले.

 
 

इतर तरुणांनीही समाजकार्यात उतरावे, यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. आपण समाजिक कार्यकर्ते जरी नसलो तरी समाजाचा एक घटक म्हणून एक कर्तव्य म्हणून वेळप्रसंगाला धावून जाण्याचा गुणधर्म प्रत्येकाने अमलात आणायला हवा, इतरांसाठी वेळप्रसंगी धावून जाणारा एक जबाबदार नागरिक म्हणून आपली ओळख कशी बनेल, असा प्रयत्नही आपला असायला हवा, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@