अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटाच्या काळात भाजप आमदार महेश बालदी उरण तालुक्यातील गरजवंतांच्या पाठीशी उभे राहिले. महेश बालदी व भाजप कार्यकर्ते तसेच सहकार्यांनी जीवनावश्यक वस्तू, मास्क, ‘पीपीई’ किटचे वाटप केले, तसेच स्थलांतरित मजुरांनाही धीर दिला व त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत केली. परिणामी, तालुक्यातील सर्वांच्याच मनात कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, हा विश्वास निर्माण झाला.
महेश बालदी
राजकीय पक्ष : भाजप
पद : आमदारमतदारसंघ : उरण
संपर्क क्र. : ९८६९०३७८२२
कोरोना महामारीच्या साथीने जग, देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरही हाहा:कार माजला. ‘लॉकडाऊन’मुळे आरोग्यसंकटापेक्षाही रोजच्या जगण्याची समस्या कोट्यवधी लोकांपुढे उभी ठाकली. त्यावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मदतीचे उपक्रम राबविण्यात आले. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातही आमदार महेश बालदी यांनी कोरोनाविरोधात लढा देत भाजप व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात दिला.
उरण तालुक्यात अनेक ठिकाणी वनवासी वस्त्या, पाडे आहेत, अशा ठिकाणी राहणार्या वनवासी बांधवांची कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे दैना झाली. पण, वनवासींना धीर देण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून सर्वच प्रकारच्या गरजूंना डाळ, गहू, तेल, तिखट-मीठ आणि अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्या वतीने भाजप उरण मंडलांतर्गत सुमारे २० हजारांपेक्षा अधिक रेशन किटचे वितरण कोरोना महासाथीच्या काळात केले गेले. परिणामी, हातावर पोट असलेल्या, गरीब-वंचित, शोषितांना यामुळे मोठा दिलासा मिळाला व आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, असा विश्वास वाटला.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, ही प्राथमिक बाब होती. हे पाहून महेश बालदी यांनी मास्क तयार करणे व त्याचे वितरण करणे, यासाठी प्रयत्न चालवले व मास्कनिर्मिती आपल्याच परिसरात करण्याचे ठरविले. त्यानुसार काम सुरू झाले व मास्कनिर्मिती आणि वितरणात उरण मंडलातील १०० कार्यकर्त्यांनी योगदान दिले. परिणामी, ठिकठिकाणी सर्वसामान्य जनतेला मास्कचे वाटप करणे शक्य झाले व उरण मंडलात सुमारे चार हजार ५०० मास्कचे वाटप करण्यात आले.
महामारीचा सामना करण्यासाठी सेवाकार्याबरोबरच आर्थिक मदतीचीही आवश्यकता होती. याच उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम केअर्स’ फंडामध्ये आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आमदार महेश बालदी व भाजप कार्यकर्त्यांनी उरण मंडलांतर्गत ‘पीएम केअर्स’मध्ये भरघोस मदत केली. संकट मोठे असल्याने प्रत्येकाने केलेली मदत कोरोना साथीला हरविण्यासाठी महत्त्वाची होती व उरण मंडलांतर्गत सुमारे ४०० लोकांनी एक लाख ९१ हजार ४८ रुपयांची देणगी ‘पीएम केअर्स’मध्ये दिली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सेवा कार्ये राबविण्यात आली. जेणेकरून गरजवंतांना मदत व्हावी. उरणमधील या सेवाकार्यात एकूण ५०० भाजप कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले, तर कोरोनामुळे सर्वसामान्य व्यक्तींना त्रास झालाच; पण वृद्ध व आजारी व्यक्तींपुढेही अनेकानेक समस्या उभ्या ठाकल्या. त्या दूर करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले व वृद्ध तथा आजारी व्यक्तींसाठी ३५० कार्यकर्त्यांनी मदतकार्य केले.
कोरोनाच्या संकटकाळात उरण तालुका भाजपने आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोविड योद्ध्यां’च्या सन्मानाचा स्तुत्य उपक्रमही केला. कारण, सर्वच ‘कोविड योद्धे’ आघाडीवर राहून कोरोनाविरोधात लढा देत होते व त्यांच्या कार्याचा गौरव करणे, आपले कर्तव्य होते. कोरोना महामारीदरम्यान पोलीस बांधव जीवाची पर्वा न करता अहोरात्र कायदा-व्यवस्था सांभाळत होते, अशा ‘कोविड योद्ध्यां’चा सन्मान राखी पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधून व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक स्वच्छता राखणे हे एक आव्हानच होते. मात्र, हे आव्हान उरणमधील स्वच्छता कर्मचार्यांनी पेलले व त्यांचा सन्मान भाजप महिला मोर्चाच्या भगिनींनी राखी बांधून व प्रमाणपत्र देऊन केला. तसेच कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे सर्व काही बंद असताना अत्यावश्यक सेवेतील लोक राबतच होते. त्यांचा सन्मानदेखील राखी बांधून व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
दरम्यान, कोरोना आपत्तीचा विपरीत परिणाम दिव्यांगांच्या आयुष्यावरही झाला. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटाच्या काळात उरण नगर परिषदेच्या माध्यमातून दिव्यांगजनांना विशेष स्वच्छता किट देण्यात आले, तर उरणमधील इंदिरा गांधी रुग्णालयात महेश बालदी यांच्या प्रयत्नातून ‘ओएनजीसी’ कंपनीच्या मदतीने डॉक्टर्स, परिचारिका आदी आरोग्य कर्मचार्यांना सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून ‘पीपीई’ किट उपलब्ध करून देण्यात आल्या.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या ४०व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत उरण तालुक्याच्या विविध भागांत ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या रोगप्रतिकारक शक्तिवर्धक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. उरणच्या नगराध्यक्षा डॉ. सायली म्हात्रे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, याचाही कोरोना आपत्तीकाळात चांगला परिणाम दिसून आला.
"या कोविड काळात आम्ही गरजूंना सर्वोपरी मदत केली. याकामी आ. प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन मला व आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लाभले. निरपेक्षपणे सेवा करत राहायची, याच प्रेरणेने आम्ही या संकटकाळात लोकांची मदत केली आणि यापुढेही करत राहू."
कोरोना महासाथ व ‘लॉकडाऊन’चा परिणाम स्थलांतरित मजुरांवर मोठ्या प्रमाणावर झाला. कारण व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडल्याने स्थलांतरित कामगारांचे हाल होऊ लागले. मात्र, स्थलांतरित कामगारांची ही बिकट अवस्था पाहून महेश बालदी यांच्यासह भाजप व कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. भाजपच्या उरण मंडलाने या काळात स्थलांतरित कामगारांना जीवनावश्यक वस्तूंसह रेशन किट पुरविले, तसेच त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र व ई-पास मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
सोबतच केंद्र सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी सुरू केलेल्या विशेष श्रमिक ट्रेनने प्रवास करणार्या पाच हजार कामगारांसाठी ई-पास, पाणी बाटल्या आणि तयार अन्नाची पाकिटेदेखील उपलब्ध करून देण्यात आली. तसेच ५० हजार कामगारांसाठी मास्कचे वाटपही करण्यात आले. एकूणच आमदार महेश बालदी व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सहकारी, कार्यकर्ते यांनी ‘सेवा परमो धर्म:’ म्हणत कोरोनाकाळात सर्वसामान्यांची मदत करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले, असेच या सर्वातून स्पष्ट होते.