देणाऱ्याने देत जावे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020   
Total Views |

jayaji nath_1  
 
 
‘मै उस प्रभू का सेवक हूँ जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं।’ या पंक्तीप्रमाणे आजन्म सेवाव्रत घेतलेल्या माजी नगरसेवक डॉ. जयाजी कृष्णा नाथ यांनी कोविड काळात एक डॉक्टर, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक म्हणून झपाटून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या मदतीमुळे हजारो गरजूंच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांच्या जीवनाला प्रकाशमान केले. तेव्हा, डॉ. जयाजी कृष्णा नाथ यांच्या महामारीच्या काळातील कार्याला दिलेला हा उजाळा...


डॉ. जयाजी कृष्णा नाथ
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी नगरसेवक
प्रभाग क्र. : १०४
सीबीडी-बेलापूर
संपर्क क्र. : ९८२१० ६००३४

 
 
नवी मुंबई महापालिकेतील आजवर एकमेव डॉक्टर नगरसेवक असलेल्या डॉ. जयाजी नाथ यांनी महामारीचे गांभीर्य वेळीच ओळखले. आपल्या वॉर्डात क्वारंटाईन सेंटर, कोरोना चाचणी सेंटर सुविधांसाठी पाठपुरावा करत असताना सिडको प्रदर्शन केंद्रात भव्य कोविड सेंटर उभारून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अन्य सुसज्ज यंत्रणा नवी मुंबई शहरात उभी करावी, अशी सर्वात आधी मागणी करणारे लोकप्रतिनिधी म्हणजे डॉ. जयाजी कृष्णा नाथ. सलग पाचव्यांदा नगरसेवक (२५ वर्षे) म्हणून निवडून येणारे एकमेव ज्येष्ठ नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी शैला नाथ या देखील माजी नगरसेविका आहेत.
 
 
वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवामुळे महामारीवेळी महापालिका क्षेत्रात कोरोना संदर्भातील सूचना, महत्त्वाच्या बैठका यांमध्ये त्यांचा आवर्जून सहभाग असतो. स्थायी समिती सदस्य असल्याने आयुक्तांपासून ते महापौरांपर्यंत थेट संपर्क ठेवत समस्यांवर शासनदरबारी तोडगा काढण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे इतर पक्षातील लोकप्रतिनिधींवरही त्यांचा प्रभाव आहे. सीबीडी-बेलापूर हा तसा उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय लोकवस्तीचा भाग. प्रभाग क्रमांक १०४ हा त्यांचा मतदार संघ. या भागातही कोरोनाचा शिरकाव हळूहळू होत होता. ‘लॉकडाऊन’मध्ये अनेकांचे थकलेले पगार आणि घरात खायला काही नाही, असे प्रश्न मध्यमवर्गीय आणि गरीब दोन्ही कुटुंबांना भेडसावत होते. डॉक्टरांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अशी कुटुंबे शोधण्याचे काम हाती घेतले. गरजू, भुकेल्यांना मदत पोहोचवण्याच्या या कार्यातून अन्नदान मोहीम उभी राहिली. प्रभाग क्रमांक १०४ सीबीडी-बेलापूर येथील हजार कुटुंबीयांपर्यंत पाच किलो तांदूळ, डाळी, मसाले, चहा पावडर, बिस्कीटे, साबण आदी सामग्रीच्या किट्सचे वाटप केले.
 
 
मास्क सक्ती झाल्यानंतर डॉ. नाथ यांनी स्वखर्चातून तीन हजार मास्कचे वाटप केले. त्यासोबतच सॅनिटायझरचेही वाटप केले. पाच हजार आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. विभागातील शंभर ते दीडशे पोलीस कर्मचार्‍यांना साबण-मास्क वाटपही त्यांनी केले. सोसायट्यांतील सुरक्षारक्षकांना मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्यात आले होते. या कार्यात त्यांना कुटुंबीयांकडूनही तितकाच हातभार लागला. त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शैला नाथही मदतकार्यासाठी हिरिरीने सहभागी होतात. या सर्व कामात त्यांचे सहकारी आणि कार्यकर्तेही स्वतःला झोकून देत असतात. या विभागाचे युवा नेतृत्व असलेल्या चैताली ठाकूर, जयदेव ठाकूर यांच्यासह नीलेश कदम, अजय सिंह, संतोष कांबळे, पुष्पा कारंडे यांचाही मोठा हातभार लागला आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून डॉ. नाथ यांनी विविध उपक्रमांसाठी मदत केली आहे. माऊली बचत गटानेही यात महत्त्वाचा वाटा उचलला. पालिकेच्या माध्यमातून ‘कम्युनिटी किचन’ सुरू करणे, अ‍ॅन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू करणे, थर्मल स्क्रीनिंग सर्वेक्षण आणि इतर गोष्टी आपल्या विभागातील नागरिकांना कशा प्रकारे मिळतील, यासाठी डॉ. नाथ यांच्यातर्फे प्रयत्न करण्यात आले होते. संपूर्ण मदतीसाठी एकूण दोन ते अडीच लाखांचा निधी खर्च केला.
 
 
 
jayaji nath_1  
 
 

 
"ज्या समाजाने मला इथवर पोहोचवले, ज्या जनतेने माझ्यावर बालपणापासून आजवर भरभरून प्रेम केले, समाजातील त्या प्रत्येक घटकाचे मी देणे लागतो. हे ऋण फेडण्याचा माझ्या परीने प्रयत्न करत आहे आणि हा प्रयत्न मी यापुढेही असाच करीत राहीन. भविष्यात स्वामी कृपेने आणि माझ्या सर्व सहकार्‍यांच्या वतीने हे कार्य करण्याचे मला बळ मिळो, हीच प्रार्थना!"
 
 

 
निर्जंतुकीकरणासाठी मदत, पालिकेच्या सर्वेक्षणातही हातभार लावण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांतर्फे झाला. थर्मल स्क्रीनिंग आणि अ‍ॅन्टीजेन चाचणी शिबिरे राबविण्याचे कामही त्यांनी केले. महामारीचे संकट असताना नवी मुंबई आणि मुंबईतील भागात अतिवृष्टी झाली. अनेक भाग पाण्याखाली गेले होते. चक्रीवादळात उन्मळून पडलेली झाडे हटवून रस्ते मोकळे केले. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत सुका खाऊ आणि पाणी वाटपही करण्यात आले.
 
 
 
डॉ. नाथ नवी मुंबई शहरात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी रुग्णसेवा याच भागात सुरू केली होती. ‘आपल्या हक्काचा माणूस’, अशी ओळख जनमानसात त्यांनी तयार केली. कुणाकडे फी भरायला पैसे नसतील तर त्याचे शुल्क माफ करणे, रुग्णाला दवाखान्यात पोहोचता येत नसेल, तर त्याच्यासाठी धावून जाणे हा डॉक्टरांचा स्वभाव गुणधर्म कोरोना काळातही कामी आला. नागरिकांना मदत करतानाचा एखादा प्रसंग त्यांना आठवला तर त्यांचे डोळे आपसूकच पाणावतात. एका घरातील कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पोहोचले असताना, त्या कुटुंबात अन्नाचा कणही नव्हता. खायचं काय, अशा हातावर पोट असलेल्या कुटुंबाची व्यथा पाहून डॉक्टरांना भरून आले. घरातील उपाशी लहान मुले आशेने कुणीतरी मदत करायला आले आहे, या अविर्भावाने पाहत होती. त्यांना तत्काळ मदत करून महिनाभराचा शिधा पोहोचवला. मुलांची भूक भागल्यावर आई-बापाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि ओढावलेला प्रसंग पाहून मनाला जाणवणाऱ्या वेदना शब्दांत वर्णन करता येणार नाहीत, अशा आहेत. अशाच एका ठाण्यात राहणाऱ्या मुलीच्या घरातील कोरोना रुग्णाला प्लाझ्मादान करण्याची गरज होती. रात्रीच्या रात्री तातडीने कोरोनातून बऱ्या झालेल्या एका कार्यकर्त्याला डॉ. नाथ यांनी त्यांच्याकडे पाठवून दिले. धन्यवाद देत असताना, त्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू काहीकाळ थांबलेच नाहीत. मुलीचा फोन ऐकून डॉक्टर साहेबांनाही भरून आले होते. अशाचप्रकारे नागरिकांच्या वीज बिल, रुग्णालयातील अवाजवी बिल आदी समस्याही त्यांनी सोडविल्या.
 
 
 
बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली. अनेक कोरोना योद्धे, पोलीस कर्मचारी सेवा बजावत असताना मृत्युमुखी पडले. त्यांचा भार कमी व्हावा त्यासाठी ’कॉप’ (सीओपी - सिटीझन ऑन पेट्रोल) ही संकल्पना राबविण्यास सांगितली आहे. मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचा अभाव असणाऱ्या ठिकाणी या स्वयंसेवकांच्या मार्फत कोरोनावर वचक ठेवण्याचे काम व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे. डॉ. नाथ यांनी एलईडी स्क्रीनद्वारे जनजागृती मोहीम राबविण्याची संकल्पना मांडली होती. प्रशासकीय व राजकीय पातळीवरही त्यांनी कोरोनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना पालिकेला दिल्या आहेत. भाजप नेते आ. गणेश नाईक यांचे सहकार्यही मोठ्या प्रमाणावर लाभले. अन्नधान्य, मास्क सॅनिटायझर आदी वस्तूंचा पुरवठा नाईक यांच्यामार्फत उपलब्ध झाला होता. ’माझा प्रभाग माझी जबाबदारी’ ही संकल्पना त्यांनी मांडून यशस्वीही केली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@