बॉक्सिंग डे कसोटीत भारत 'अजिंक्य'

    29-Dec-2020
Total Views | 76

Ajinkya Rahane_1 &nb 

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्स राखून विजय

 
 
 
मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या 'बॉक्सिंग डे' कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. अंजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराला गमावले. पण, शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेने विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने ७ चौकारांसह ३५ तर रहाणेने ३ चौकारांसह २७ धावा केल्या. या विजयामुळे भारताने 'बॉर्डर-गावसकर' कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या डावात शतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्यला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
 
 
 
सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात २०० धावांवर सर्वबाद झाला. महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चौथ्या दिवशी कॅमरून ग्रीन आणि पॅट कमिन्स यांनी तिसऱ्या दिवशी केलेल्या ६ बाद १३३ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र भारताच्या गोलंदाजीसमोर ते जास्त तग धरू शकले नाही. मोहम्मद सिराजने ३ तर, अश्विन, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121