बुलेट ट्रेनला विरोध म्हणजे शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ !

    26-Dec-2020
Total Views | 183

Thane Bullet train_1 
 
ठाणे : केंद्र सरकारच्या महात्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा देण्याचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करून ठाणे महापालिकेतीत सत्ताधारी शिवसेनेने खोडा घातल्याने याचे पडसाद आता जनमानसात उमटु लागले आहेत.बुलेट ट्रेनच्या ठाण्यातुन जाणाऱ्या मौजे शिळ मार्गावरील काही गावांमधील शेतकऱ्यांना ७० टक्के मोबदला मिळाला असताना ठाणे महापालिकेला आताच दुर्बुद्धी सुचली. असा आरोप येथील भूधारक शेतकरी करीत असुन शिवसेना एकीकडे शेतकऱ्यांचे हित हवेय म्हणते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम करीत असल्याच्या संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
 
 
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई अहमदाबाद हायस्पीड (बुलेट) ट्रेन हा प्रकल्प उभारला जात ठाणे,भिवंडी तालुक्यातील भुसंपादन प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. मुंबईपासून भुमीगत असलेला हा प्रकल्प शिळफाटा इथून उंच पुलावरून मार्गक्रमण करणार असुन यासाठी मौजे शीळ सोबत डवले,पडले,माथर्डी,देसाई,आगासन आणि बेटावदे या गावांमधील जमिनीचे भूसंपादन योग्य मोबदला देऊन सुरू आहे. या प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेची जागा मिळवण्यासाठी महसुल विभागाकडून पत्रव्यवहार केल्याने त्या अनुशंगाने प्रशासनाकडून सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव दाखल केला होता.
 
 
 
ठाणे महापालिकेच्या शिळ येथील ३ हजार ८४९ चौ.मी. जागेसाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदला निश्चित करण्यात आला. तसा प्रस्ताव जानेवारी महिन्यापासून सातत्याने सर्वसाधारण सभेसमोर आणुनही शिवसेनेने या प्रकल्पास विरोध दर्शवत बुलेट प्रकल्पास जागा देण्याचा प्रस्ताव रोखून धरला होता. आता डिसेंबरमधील सर्वसाधारण सभेमध्ये चर्चाही न करता हा प्रस्तावच दफ्तरी दाखल करून शिवसेनेने खोडा घातल्याने या भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत.शासनाच्या अखत्यारीतील १०० टक्के जागांचे भूसंपादन झाले असुन ४५ टक्के खाजगी जमिनीदेखील दिल्या आहेत.ठाणे महापालिका व इतर प्राधिकरणांच्या जमिनीही नॅशनल हायस्पीड योग्य मोबदला देऊन घेत आहे. असे असताना ठाणे महापालिकेने विरोध करून काय मिळवले ? असा सवाल सुदर्शन मुंडे, अनंता म्हात्रे, नरेंद्र म्हात्रे आदीं शेतकरी करीत आहेत.बुलेट ट्रेन झाली तरच या गावांचा आणि आमचाही विकास होईल. अन्यथा मिळणारा मोबदलाही रद्द होईल.अशी भिती व्यक्त करून शेतकऱ्यांनी,आता आमच्या पोटावर लाथ का मारता ? असा सवाल केला आहे.
 
ठाणे महापालिकेला सुचली दुर्बुद्धी
 
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक निवेदने, आंदोलने झाल्यानंतर योग्य मोबदला मान्य झाला.मोबदल्याची ७० टक्के लोकांच्या खात्यात जमादेखील झाली.आणि आता ठाणे महापालिकेला दुर्बुद्धी सुचली.एकीकडे शिवसेना शेतकऱ्यांचे हित हवेय म्हणते.दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पोटावर तरी मारू नका.बुलेट ट्रेन प्रकल्प झालाच पाहिजे,महापौरपदी विराजमान झाल्यापासुन एकदाही दिव्यात न आलेल्यांनी यात हस्तक्षेप करू नये.
- रोहिदास मुंडे - आगासन गाव संघर्ष समिती,अध्यक्ष
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121