सेटवर दोनजण 'पॉझिटीव्ह' - रजनिकांत रुग्णालयात

    25-Dec-2020
Total Views | 100

rajnikant_1  H
 


हैदराबाद : सुपरस्टार रजनिकांत यांना शुक्रवारी १० वाजता हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या १० दिवसांपासून ते सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. सिनेमाच्या सेटवर काही जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. रजनिकांत यांची २२ डिसेंबर रोजी करण्यात आलेली कोरोना चाचणी करण्यात आली होती.
 


कोरोना अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतरही त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून होते. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. रजनिकांत यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत. रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रक्तदाब नियमित झाल्यावरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121