‘कोरोना’ उगमस्थान कोणते?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2020   
Total Views |

wuhan_1  H x W:


 
कोरोनाचे उगमस्थान कुठे आहे, असा प्रश्न कुणालाही विचारला तर चीन, असेच अपेक्षित उत्तर मिळेल. त्यातल्या त्यात बर्‍यापैकी सुशिक्षित किंवा माहितगार व्यक्तीला याबद्दल विचाराल, तर ‘वुहान’ शहर, असेही उत्तर मिळेल. मात्र, याच चीनने भारतामुळे जगात कोरोना पसरला, असा दावा केला आहे.
 
 
 
अर्थात, चीनच्याच शास्त्रज्ञांनी तसे म्हटल्याने त्यांच्या या म्हणण्याला किती गांभीर्याने घ्यायचे हेदेखील विचार करण्यासारखे आहे. कारण, जिथून हा विषाणू जगभर पसरला ते वुहानवासीय मात्र आज कोरोनासंकटाच्या वर्षपूर्तीनिमित्त चीनलाच शिव्याशाप देत आहेत. काधिकारशाही असलेल्या चीनमधून कोरोना जगात पसरला कसा, याबद्दलची ठोस माहिती मिळविण्यासाठी एक वर्ष उलटून गेले. जागतिक आरोग्य संघटनेच्या हातीही काहीच लागले नाही. कोरोनाच्या लसींवरही काम सुरुच आहे.
 
कोरोनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जागतिक प्रसिद्धी माध्यमांनी वुहानमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. तिथल्या लोकांच्या भावना जाणून घेतल्या. हुबेई प्रांतात ५५ ते ६० वर्षे वय असलेला पहिला रुग्ण कोरोनाच्या विळख्यात अडकला होता. त्याच्या नातेवाईकांनी आंतरराष्ट्रीय पत्रकारांसमोर आपले गार्‍हाणे मांडले. “संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याची माहिती चिनी सरकारने लपवून ठेवली होती,” असा आरोप त्याने केला. ही संबंधित व्यक्ती आपल्या आईवडिलांच्या अकाली निधनातून अजूनही सावरलेली नाही.
 
 
 
तिथलेच एक रहिवासी झोंग हेगेंग आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे संकटात आहेत. त्यांनाही संक्रमण झाल्यामुळे मित्र, नातेवाईकांनीही त्यांच्यापासून ‘डिस्टन्सिंग’ पाळले आहे. एका वर्षानंतर वुहानमध्ये आजही काहीच बदलेले नाही. नागरिकांच्या समस्या कमी झालेल्या नाहीत. कोरोनाने जितके नुकसान इतर ठिकाणी केले, तितकेच नुकसान चीनमध्येही केले.
 
 
वुहानच्या कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ओइकिंग यांचे ७८ वर्षीय वडील लियू नियमित चाचणीसाठी गेले होते. त्याचवेळी त्यांना कोरोना संक्रमण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु, कोरोना टेस्ट किट्सचा अभाव आणि आरोग्यसेवकांची वानवा आदी अडचणींपुढे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. उपचाराअभावी २९ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. एक कार्यकर्ता असल्याने त्यांच्या भावनांचा उद्रेकही असह्य होता.
 
 
वडिलांच्या जाण्याचे दुःख होतेच; मात्र आपल्या सरकारने एवढी मोठी महामारी जगापासून काही आठवडे लपवून ठेवली, याचे दुःख मोठे होते. मृतांचा आकडा चार हजारांवर पोहोचला होता. चीन ही गोष्ट सातत्याने दाबून टाकण्याचा प्रयत्न करत होता. जागतिक प्रसारमाध्यमे चीनमध्ये कोरोनाच्या विस्फोटाचा दावा करत होती.
 
 
ग्राऊंड रिपोर्टसाठी परवानगी मागत होती. मात्र, तिथल्या सरकारने सार्‍यांचीच मुस्कटदाबी केली. परिणामी, जगाला एका मोठ्या संकटाच्या दरीत ढकलण्यास चीनच कारणीभूत ठरला. चीनच्या या वागणुकीनंतरही स्वतःची चूक सुधारू शकला असता; मात्र तशीच घोडचूक त्यांच्याकडून वारंवार होत राहिली. आपल्या शेजारील सीमांवर तणाव निर्माण केला. आता कोरोना भारतातूनच पसरला आहे, असा हास्यास्पद दावा केला.
 
 
कारण, ज्या वेळी कोरोना वुहानमध्ये पाय पसरत होता, त्यावेळी ५००हून अधिक लोक सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी बाहेर गेले होते. काही राजकीय कार्यक्रमही झाले होते. कोरोना रुग्ण आणि त्याची सत्यता जाणून असणार्‍यांचीही मुस्कटदाबी झाली. काही शास्त्रज्ञ गूढरीत्या गायब झाले. त्या काळात अमेरिकेने खुलेपणाने चीनविरोधात भूमिका घेतली होती, तसेच भारतानेही अप्रत्यक्षपणे चीनविरोधातील जनआंदोलनाचा स्वीकार केला. चीनमध्ये आजही परिस्थिती निवळलेली नाही.
 
 
कोरोना लपविण्यासाठी पोलीस यंत्रणा तितकीच बंदोबस्ताला लावण्यात आली आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता प्रसारमाध्यमे वुहामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते पोहोचू शकलेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेचे महानिर्देशक टेड्रोस एडहोम घेब्रेयस यांनी कोरोनाच्या मूळगावी जाऊन तपास करण्याची घोषणा तर केली खरी; परंतु एकाधिकारी चीन सरकार कोरोनाचे खरे कारण शोधू देईल का? विषाणू नेमका कसा तयार झाला, याचा तपास करण्यासाठी निःपक्ष भूमिका घेईल का? असे अनेक प्रश्न अद्याप निरुत्तरीतच आहेत.


@@AUTHORINFO_V1@@