चिनी ‘सुपर सोल्जर्स’ला भारताचे प्रत्युत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2020   
Total Views |

indo china_1  H


चीन त्याच्या लष्करी सैनिकांची जैविक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. चीनने जैविक क्षमता वाढवण्यासाठी अनेक जैविक चाचण्या या त्यांच्या सैनिकांवर केल्या आहेत. त्यामधून ‘सुपर सोल्जर्स’ तयार केले जात असावेत, अशी माहिती अमेरिकेचे ‘नॅशनल इंटेलिजन्स’चे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी दिली आहे. त्यांची ही माहिती अमेरिकेच्या ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ या प्रख्यात पत्रिकेत प्रकाशित झाली आहे. अजून अनेक चाचण्या चीन करत आहे, ज्यामुळे चीन सैनिकांची लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.


संकटाचे रूपांतर भारत एका संधीमध्ये


लष्करी कारवाया करून भारताला लडाख भागात हरवण्यामध्ये चीनला गेल्या सात महिन्यांमध्ये पूर्णपणे अपयश आले आहे. म्हणून आता चीन वेगवेगळ्या गैरलष्करी पद्धतींचा वापर करून भारत-चीन सीमेवर तणाव कायम ठेवायचा प्रयत्न करत आहे. याचा मुख्य उद्देश आहे की, ही सीमा कायमची गरम राहावी आणि भारताला या सीमेवरती पुष्कळ जास्त सैन्य तैनात करायला लागावे, ज्यामुळे भारताचे लष्करी ‘बजेट’ वाढेल आणि आर्थिक प्रगतीचा वेग कमी होईल.वातावरणात बदल करून भारताच्या मालकीच्या प्रदेशावर इतर पद्धतीने कब्जा करणे हे सामील आहे. चीन सीमेवर गावे वसवत आहे. मात्र, या संकटाचे रूपांतर भारत एका संधीमध्ये करून चीनच्या विरुद्ध गुप्तहेरगिरी करू शकतो. कारण, येथील बहुतेक नागरिक हे तिबेटियन आहेत आणि त्यांना दलाई लामा आणि भारताविषयी प्रेम आहे. या विषयावर आपले विश्लेषण केंद्रित करू. मात्र, या लेखामध्ये जैविक संशोधनाचा वापर करून ‘सुपर सोल्जर्स’ तयार करणे, जे अति उंच भागात जास्त क्षमतेने लढाई करू शकतील याला भारताचे प्रत्युत्तर काय असेल, यावर आपण लक्ष केंद्रित करु.


सैनिकांची जैविक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात


गेल्या वर्षी दोन अमेरिकन विद्वानांनी युद्धक्षेत्रात बायोटेक्नॉलॉजी लागू करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेचे परीक्षण केले होते. त्यांच्या अभ्यासामध्ये असे दिसले की, चीनने मानवी कामगिरी वाढविण्यासाठी ‘जिन-एडिटिंग’ तंत्रज्ञान वापरले आहे. चीन जगाच्या मोठ्या कंपन्यांची बौद्धिक संपत्ती लुटते. तंत्रज्ञानाची नक्कल करते आणि नंतर त्या कंपन्यांची जागा जागतिक बाजारपेठेत घेते. चीन त्याच्या लष्करी सैनिकांची जैविक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. चीनने जैविक क्षमता वाढवण्यासाठी अनेक जैविक चाचण्या या त्यांच्या सैनिकांवर केल्या आहेत. त्यामधून ‘सुपर सोल्जर्स’ तयार केले जात असावेत, अशी माहिती अमेरिकेचे ‘नॅशनल इंटेलिजन्स’चे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी दिली आहे. त्यांची ही माहिती अमेरिकेच्या ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ या प्रख्यात पत्रिकेत प्रकाशित झाली आहे. अजून अनेक चाचण्या चीन करत आहे, ज्यामुळे चीन सैनिकांची लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.


चीनने क्षमता वाढवण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाचा वापर यापूर्वीही करण्यात आला होता. अनेक अ‍ॅथलिट स्पर्धेमध्ये क्षमता वाढवण्यसााठी अनेकदा हार्मोन्सची इंजेक्शन्स घेतात, स्टिरॉईडचे सेवन करतात जेणेकरून ठराविक काळापुरती त्यांची क्षमता वाढते. त्यामुळे जागतिक विक्रम करण्यात त्यांना मदत होते. अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू यामुळे अडचणीतही आले आहेत. काही वर्षांपूर्वी ज्यो ग्रिफिथ जॉयनर नावाच्या अमेरिकेन महिला खेळाडूने दोन वेळा जागतिक स्तरावर सुवर्णपदक जिंकले. १० सेकंदात १०० मीटर पार करणारी ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली होती. त्यावेळी संशय व्यक्त करण्यात आला होतो की, त्या कोणत्यातरी अमली पदार्थांचा वापर करत आहेत. हा संशय खरा ठरला आणि जागतिक विक्रम मोडीत काढल्यानंतर दोन वर्षांतच तिचा मृत्यूही झाला.‘भविष्यातील युद्धांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. ‘सुपर सोल्जर’ची संकल्पना विज्ञानकथा/कॉमिकमधून विचारात घेतल्या आहेत. यामध्ये डीएनए किंवा जनुकीय रचनेमध्ये बदल करून मानवी क्षमता वाढू शकते, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’प्रमाणेच शरीराचे भाग, स्वतःहूनच वाढणारे अवयव यांसारख्या गोष्टी भविष्यात अस्तित्वात असू असतील. मात्र, निसर्गाच्या विरोधात जाऊन मानवी शरीरामध्ये बदल करणे योग्य नाही, म्हणून शास्त्रज्ञ समाज अशा संशोधनाला विरोध करतात.


चीन हे का करतो आहे?


म्हणजे जैविक संशोधनाचा वापर करून आपली शारीरिक क्षमता वाढवणे हे तात्पुरते असते किंवा काही काळापुरते मर्यादित असते. परंतु, त्याचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो. मग चीन हे का करतो आहे?अत्यंत उंच जागांवर चिनी सैनिकांची लढण्याची ताकद किंवा क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे त्या भागात असणारी सैनिकांची क्षमता वाढवण्यासाठी ते ‘सुपर सोल्जर’ची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे ‘सुपर सोल्जर्स’ रात्रीच्या वेळेला जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. त्यांची ताकद, दम, चपळता खूप वाढली असेल आणि सर्वसाधारण चिनी सैनिकांच्या तुलनेत पुष्कळ अधिक वेळ या कठीण सीमेवर ते चांगल्या पद्धतीने काम करून शत्रूंचा पराभव करू शकतील. चीनने जागतिक महासत्ता होण्यासाठी नैतिकेचे पालन केलेले नाही. ज्या प्रकारे त्यांनी वुहानच्या प्रयोग शाळेमध्ये चिनी विषाणूची निर्मिती करून जगाचे कंबरडे मोडले आहे, तशाच प्रकारे मानव जातीवर जैविक संशोधन करून जगावर राज्य करण्याची त्यांची लालसा आहे. त्यामुळे जगाने या विषयावर फारच गांभीर्याने विचार केला पाहिजे.चीनच्या या कारवायांना रोखण्यासाठी जग काय करू शकते, जगाचे कायदे असे म्हणतात की, आण्विक, जैविक किंवा रासायनिक संशोधन हे जर मानवजातीच्या विरोधात असेल तर ते केले जाऊ नये. याचाच चीनच्या विरोधात वापर करून त्यांनी अशा प्रकारचे संशोधन थांबवावे म्हणून दबाव आणणे आवश्यक आहे. चीन या दबावाला भीक घालेल का? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. कारण, अनेक आंतरराष्ट्रीय कायदे चीन पाळत नाही तसेच यामध्येही होऊ शकते. म्हणून यामध्ये सामान्य चिनी नागरिकांकरिता एक मानसिक युद्ध करावे लागेल आणि त्यांना हे सांगावे लागेल की, चिनी सरकार चिनी नागरिकांवरतीच संशोधन करून त्यांचे आरोग्य कसे धोक्यात आणतो आहे. काही वर्षांपूर्वी चिनी खेळाडूंनी जगावर वर्चस्व गाजवायला सुरूवात केली होती. त्याही वेळेला चिनी खेळाडू अचानक जागतिक दर्जाचे कसे होऊ लागले, अशी शंका निर्माण झाली होतीच. त्याही वेळेला अमली पदार्थ, संप्रेरकांची इंजेक्शन तसेच जैविक संशोधनातून आपली क्षमता वाढवली असावी. म्हणजे अशा गोष्टी आधीसुद्धा झालेल्या आहेत. चीनमध्ये हे सर्व करण्याची क्षमता नक्कीच आहे. त्यामुळेच त्यांच्या या क्षमतेवर लक्ष ठेवून ते नेमके काय करत आहेत, यावर जगाचे बारकाईने लक्ष असावे.


इतर देशांचे संशोधन

अमेरिकेच्या लष्कराकडूनही असामान्य सैनिक विकसित करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामध्ये दुखण्यावर मात करणे, टेलिपथी किंवा रोबोटिक्सचा विचार करून सैनिकांची परिणामकारकता वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. अन्य देशांनीही अशा संशोधनांमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यामध्ये फारशी प्रगती झालेली नाही. मात्र, संशोधन थांबले नाही. स्पोर्टस मेडिसिनध्येे खेळाडूंची कामगिरी/क्षमता वाढवण्याकरिता अविरत संशोधन केले जाते मात्र नैतिकतेची हद्द ओलांडली जात नाही.


भारताने काय करावे?


भारताचा विचार करता, स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. चिनी कोरोना विषाणूविरोधातील लसीवरती संशोधन केले जाते आहे. जगाने मान्य केलेल्या पद्धतीने भारतीय शास्त्रज्ञांनीही संशोधन सुरू करावे, जेणेकरून अशा प्रकारच्या जैविक धोक्यांना तोंड देण्यास भारत तयार राहू शकेल. जोपर्यंत चिनी ‘सुपर सोल्जर’चा प्रश्न आहे, तर चीनवर बारीक लक्ष ठेवून गरज भासली तर जगाची मदत घेऊन चीनचे घातकी संशोधन थांबवण्याची गरज आहे. जगातील विविध कायद्यांचा वापर करून चीनला रोखण्याचा प्रयत्न केला जावा.इस्रायलने अनेक वेळेला अशा प्रकारचे संशोधन जगाच्या विरोधात जात होते, त्यावेळी हल्ला करून संशोधन करणार्‍या संशोधकांवर किंवा संस्थांवरही हल्ले केले आहे. उदाहरणार्थ गेल्या महिन्यात इराणचे अणुशास्त्रज्ञ जे इराणसाठी अणुबॉम्ब तयार करत होते त्यांना ठार मारले. त्यामुळे इराणचा आण्विक कार्यक्रम दहा वर्षे मागे पडला आहे. अशा प्रकारच्या कारवाया अमेरिका, इतर युरोपियन राष्ट्र चीनविरूद्ध करू शकतील का, यावरसुद्धा विचार करणे गरजेचे आहे. आपल्याकडे चीनच्या या संशोधनाला प्रत्युत्यर देण्यासाठी वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करून आपण आपल्या संशोधनाचा वेग वाढवला पाहिजे.
@@AUTHORINFO_V1@@