नवी दिल्ली : जागतिक पतमानांकन संस्था असलेल्या स्टॅण्डर्ड अॅण्ड पूअर्सने देशाच्या अर्थव्यवस्थेत नऊ टक्क्यांनी घसरण होणार असल्याचे भाकीत केले आहे. अर्थव्यवस्थेतील सुधाराबद्दलही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, ही बाब कोविडचे संक्रमण कितपत रोखले जाऊ शकते याबद्दल यावर ही सुधारणा अवलंबून आहे.
आशियातील पॅसिफिक रिपोर्ट अंदाज
S&P तर्फे आशिया पॅसिफीक रिपोर्टमध्ये हा अंदाज व्यक्त केला आहे. भारताचा जीडीपी पुढील वर्षांत १० टक्क्यांनी वधारू शकतो. अहवालानुसार, २०२०-२१ वर्षात देशातील विकासदरात ९ टक्क्यांनी घसरण नोंदवली जात आहे. मात्र, २०२१-२२ मध्ये यात १० टक्क्यांनी वृद्धीही व्यक्त केली जात आहे. देशातील अर्थव्यवस्था गतीने सुधारणा होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोना नियंत्रणात नाही
संस्थेच्या मते, कोरोना संपूर्ण देशात पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. याचा परिणाम येईपर्यंत काही काळ वाट पाहावी लागेल. पुढील वर्षी पहिल्या तिमाहीपासून तिसऱ्या तिमाहीपर्यंत कोरोना आकडेवारीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, दुसऱ्या तिमाहीत जुलै-सप्टेंबरपर्यंत देशातील अर्थव्यवस्थेचा विकासदर ७.५ टक्क्यांनी घसरल्याचे सांगण्यात आले. मात्र, उत्पादन क्षेत्रात वृद्धी दिसून आली. त्यामुळे जीडीपी घसरण रोखण्यासाठी फायदा झाला होता.
पहिल्या तिमाहीत जीडीपी २३.९ टक्क्यांनी घसरला
पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये २३.९ टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरमध्ये लावलेल्या अनुमानानुसार, औद्योगिक क्षेत्रातील अग्रणीय ठरत आहे. वर्षभराच्या तुलनेत पूर्वीपेक्षा जास्त प्रगती आहे. ग्राहक उपयोगी वस्तूंची मागणी वाढत असल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसऱ्या तिमाहीत सुधारणा
दुसऱ्या तिमाहीत सुधारणा होत आहे. प्रकल्प मार्गी लागले आहेत. S&Pच्या मते, महागाई दरातही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नुकतीच ही वाढ जास्त झाली आहे. संस्थेच्या मते, महागाई वृद्धीत वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते ही वाढ २ ते ६ टक्क्यांवर आली आहे. खाद्य वितरण क्षेत्रात घट नोंदवण्यात आली. २०२१ मध्ये रिझर्व्ह बँक व्याजदरांत वाढ होईल. रिझर्व्ह बँकही कपात करणार नाही, अशीही शक्यता S & P तर्फे व्यक्त करण्यात येणार आहे.