लग्न लावून परताना १४ जणांचा अपघाती मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2020
Total Views | 61

pratapgarh_1  H
 
लखनौ : उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमध्ये एका अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. हे सर्व लोक एका लग्नसमारंभाहून परतत होते. यावेळी भरधाव चारचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे .
 
 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक शेखपूर गावातील एका लग्नसमारंभाला गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा अपघात एवढा भीषण होता की काही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ तरुण आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी गॅस कटरच्या सहाय्याने चारचाकीचे भाग कापून गाडीतील मृतदेह बाहेर काढले.
 
 
संपूर्ण कारवाई करण्यासाठी पोलिसांना दोन तासांहून अधिक कालावधी लागला. त्यानंतर पोलिसांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मृतांमधील १२ लोक प्रतापगडच्या कुंडा तालुक्यातील जिगरापुर चौसा गावाचे रहिवासी होते. तर, गाडी चालकासोबत दोन लोक कुंडा भागातील दुसऱ्या एका गावातील रहिवासी आहेत. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...