आज जगासमोर इस्लामी कट्टरतावाद आणि चीनच्या विस्तारवादाचे आव्हान उभे ठाकलेले असून वैश्विक शांतीसमोरील सर्वात मोठा धोका म्हणून त्यांना ओळखले जाते. मात्र, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन आपल्या बेटाला संकट आणि समस्येच्या अशा भोवर्यात घेऊन जाऊ इच्छितात की, ज्यातून बाहेर पडणे मुश्किल होईल.
पोलीस कॉन्स्टेबल जिना अली यांनी सर्वप्रथम हिजाबसह वर्दी परिधान करत याची सुरुवात केली असून, आता मला माझ्या धार्मिक व वैयक्तिक श्रद्धेशी तडजोड करावी लागणार नाही. तसेच हिजाबसह वर्दीमुळे पोलीस सेवेत येण्यास टाळणार्या महिला आता काम करु शकतील, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, हिजाब महिलांच्या शुद्धता आणि विनयाचे द्योतक असून महिलांनी आपले केस, गळा, वक्षस्थळ आणि खांदे झाकले पाहिजेत, ही यामागची धार्मिक बाब आहे.
दुर्दैव म्हणजे, न्यूझीलंडमध्ये हिजाब परिधान करण्याला महिला सशक्तीकरणाचे नाव दिले जात असून जेसिंडा आर्डेन हे करत आहेत. आर्डेन या माध्यमातून धर्मांध इस्लाम व कट्टरतावादासाठी देशाचे दरवाजे खुले करत आहेत. कारण, हिजाब वगैरेचे नियम तयार करणारे लोक हेच आहेत. दमनकारी विचारांसमोर झुकणे, त्याला सामान्य करणे आणि कोणता तरी बहाणा करुन त्याचा प्रचार करण्याने कट्टरतावाद्यांचा स्वभाव कधीही बदलत नाही, उलट तो अधिकाधिक कट्टर होत जाईल. आज संपूर्ण जग धर्मांध इस्लामी दहशतवादाशी झुंजत असून त्याला नकार देणे युरोपीय देशांसमोरही संकट बनत चालले आहे.
तिथे होणार्या दहशतवादी घटनांवरुन त्याचा अंदाज लावता येतो. उल्लेखनीय म्हणजे, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पदभार स्वीकारला तेव्हा ते उदारमतवादी होते, पण काळाबरोबर त्यांनी कट्टरतावादाचा धोका ओळखला व आता ते कट्टरतावादाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलत असल्याचे दिसते. परंतु, न्यूझीलंड अशाचप्रकारची चूक करुन कट्टरतावादासाठी मार्ग प्रशस्त करत असेल तर आगामी वर्षांत त्या देशाचा उदारमतवाद त्या देशाच्या अस्तित्वासाठीच संकट सिद्ध होऊ शकते.
दरम्यान, न्यूझीलंड व चीन संबंधांबाबत गेल्या तीन वर्षांत दोन्ही देश जवळ आल्याचे दिसते. जेसिंडा आर्डेन चीनमधील उघूर मुसलमानांवरील दडपशाहीचा मुद्दा उचलतात, पण त्या देशाबरोबर संबंध बिघडू नयेत, याकडेही त्यांचे लक्ष असते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांतील जेसिंडा आर्डेन यांचा जोरदार विजय आणि परराष्ट्रमंत्री व्हिन्स्टन पिटर्स यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर कित्येक विश्लेषकांच्या मते, आगामी काळात न्यूझीलंड व चीनमधील संबंधांत वाढ होईल. कारण, आर्डेन चीनशी संबंध खराब करु इच्छित नाहीत.
उल्लेखनीय म्हणजे, जेसिंडा आर्डेन यांच्या विजयानंतर चिनी सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने लेख लिहून कौतुक केले होते आणि चीनबरोबर मधुर संबंध राखण्याचे म्हटले होते. आर्डेन यांनी आपल्या देशात हुवावेवर बंदी घातलेली नाही, तर ऑस्ट्रेलियात हुवावेवर बंदी आहे. म्हणजेच जेसिंडा आर्डेन यांच्या नेतृत्वातील न्यूझीलंड चीनला पाठिंबा देण्यातून मागे हटणार नाही. मात्र, न्यूझीलंडच्या इस्लामी कट्टरतावादाला प्रोत्साहन देणार्या चीनशी जवळीक साधणार्या पावलांमुळे तिथले नेतृत्व चुकीच्या मार्गाने जात असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण, याचे परिणाम त्या देशालाच भोगावे लागतील.