सेन्सेक्स, जग आणि ‘कोरोना’ लस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2020   
Total Views |

jp_1  H x W: 0


ज्या सकारात्मक वृत्ताची वाट सगळे पाहत होते, ते वृत्त प्राप्त झाल्याने बाजार उत्साही तेजीने वर आला. फायझर कंपनीने कोरोना लसीबाबत दिलेल्या सकारात्मक आणि आश्वासक अहवालाने बाजारात उत्साह पसरला. फायझरच्या म्हणण्यानुसार, जर्मन भागीदार बायोएनटेक एसीसोबत विकसित केलेली कोविड लस ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात परिणामकारक आहे. कोणत्याही कंपनीने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कोविडला रोखणारी प्रभावी लस प्राप्त झाल्याची बातमी दिल्याने जग लवकरच पूर्ववत होत असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.


आनंद आणि उत्साहाने भरलेल्या दिवाळीत सेन्सेक्स आणि निफ्टी या भारतीय भांडवल बाजारांनी आधीच दिवाळी साजरी केली. त्यांनी आपला निर्देशांक नव्या विक्रमी उंचीवर नेऊन ठेवला. अर्थातच त्यास जागतिक स्तरावर कोरोना लसीची होणारी उपलब्धता हे कारण आहे. शेअर बाजार अनेकदा भावनांच्या आधारावर मार्गक्रमण करताना दिसून येते. मात्र, असे असले तरी अनेकदा आकांक्षा, भविष्यकालीन संभाव्य प्रगतीचाही त्याच्यावर परिणाम होतो. दि. १४ नोव्हेंबरला बाजार विक्रमी वाढला त्याला प्रामुख्याने कोरोनाविषयक सकारात्मक वृत्ताचे पाठबळ आहे. केवळ एकाच क्षेत्राच्या अथवा कंपनीच्या वृत्ताने संपूर्ण बाजार ‘बुल रन’मध्ये परावर्तित होणे, हे अलीकडच्या व्यापक, विकेंद्रित ग्राहक व्यवस्थेमुळे अवघड असते. मात्र, ज्या सकारात्मक वृत्ताची वाट सगळे पाहत होते, ते वृत्त प्राप्त झाल्याने बाजार उत्साही तेजीने वर आला. फायझर कंपनीने कोरोना लसीबाबत दिलेल्या सकारात्मक आणि आश्वासक अहवालाने बाजारात उत्साह पसरला. फायझरच्या म्हणण्यानुसार, जर्मन भागीदार बायोएनटेक एसीसोबत विकसित केलेली कोविड लस ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात परिणामकारक आहे. कोणत्याही कंपनीने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कोविडला रोखणारी प्रभावी लस प्राप्त झाल्याची बातमी दिल्याने जग लवकरच पूर्ववत होत असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.


भारतात मार्चपासून, जगभरात त्याच्याही आधीपासून सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे लोकांचे जगणे अवघड बनले. परिणामी, सगळीकडचे बाजार आणि आर्थिक व्यवहार बंद पडले. रशिया, चीन आणि ऑक्सफर्ड यांच्या लसीचे वृत्त अधूनमधून आशेचा किरण दाखवत होते. तथापि, बाजार ज्या सकारात्मक बदलाची वाट पाहत होता, त्याची घोषणा फायझरने केली. म्हणून त्या सकारात्मकतेला बाजाराने उदंड प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली. भारतीय रोखे बाजारावर पडलेले प्रतिबिंब अन्य जागतिक भांडवली बाजार आणि संलग्न घटनांच्या पार्श्वभूमीवर आहे. महत्त्वाची घटना अर्थात अमेरिकेतील निवडणूक. तेथे बायडन हे देशाचे पुढील राष्ट्राध्यक्ष असतील या घटनेचे बाजाराने अपेक्षितपणे स्वागत केले. तसेच, अमेरिकन सरकारकडून आर्थिक मदत सुरूच असणार आहे आणि त्याची गरज आहे, असे तेथील अर्थप्रमुखांनी स्पष्ट केले. डलास फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष रॉबर्ट कॅप्लान यांनी देशाची अर्थव्यवस्था नव्या भरारीसाठी तयार होत असल्याचे सूचित केले. कोविडवर परिणामकारक लस उपलब्ध झाल्यास ती संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी वरदान ठरेल, हे सगळ्यांना ज्ञात आहे. मात्र, जगाच्या अर्थकारणात त्याच्यामुळे काय परिणाम होतील, याचा अंदाज बांधत रोखे बाजार मांडत असतो. वित्तपुरवठा संस्थाही त्यामुळेच रोखे खरेदीदारांच्या आवडत्या ठरल्या. सेन्सेक्सच्या ३० निवडक शेअर्सपैकी एक असलेल्या बजाज फायनान्सने दिवसभरात नऊ टक्के वाढ नोंदवत एका दिवसांत ३४५ रुपयांची कमाई करून दिली. त्याचबरोबर बँकांचे रोखे गेले काही दिवस तेजीत आणि खरेदीदारांच्या आवडीच्या रोख्यांमध्ये सामील झाले होते, ते कायम राहिले. त्याचे कारण कोविडवरील औषधाबरोबरच कंपन्यांची दुसर्‍या तिमाहीतील सकारात्मक कामगिरी.

नव्या उद्योगात उतरणे, उद्योग विस्तारणे आदी व्यवहार नैसर्गिकरित्या होतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्जाची गरज असते. अजून अनेक कंपन्यांचे निकाल येत्या काही दिवसांत अपेक्षित आहेत. त्यांचे सकारात्मक निकाल सध्या निर्माण झालेली तेजी कायम ठेवण्यासाठी साहाय्यभूत ठरू शकतात. सिंगापूर व हाँगकाँगने सकारात्मक प्रतिसाद देत आपापले निदर्शक वर नेले. अमेरिकेच्या डाऊ जोन्स इंडस्ट्रियलचा निर्देशांक तब्बल तीन टक्क्यांनी म्हणजे सुमारे ८५० अंशांनी वाढला. एका दिवसात इतकी वाढ पाच महिन्यांपूर्वी नोंदवली गेली होती. जपानच्या निक्कीने २२५ अंश, अमेरिकेच्या एस अ‍ॅण्ड पीने ५०० अंशांची वाढ नोंदवली. त्यामुळे, आता येत असलेली तेजी हा तेजीचा नवा टप्पा असल्याची बाजाराची भावना आहे. सेन्सेक्सच्या वाढीचा वेग आणि एकंदर सकारात्मकेतेचा विचार करता आता ४३ हजारांचा टप्पा पार केलेला सेन्सेक्स दिवाळीपर्यंत ४७ हजारांचा टप्पा गाठेल, अशी आशा आहे . ही केवळ कल्पनेची उड्डाणे नाहीत तर जगभरातील सकारात्मकतेला भारतीय बाजाराने दिलेला प्रतिसाद आहे, असेच म्हणावे लागेल.
@@AUTHORINFO_V1@@