हीच श्रींची इच्छा ! म्हणत राज्यातील मंदिरं उघडण्यास परवानगी

    14-Nov-2020
Total Views | 134

temple_1  H x W



मुंबई :
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीने जोर धरला होता. परंतु राज्य सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचललेले जात नव्हते. मात्र अखेर राज्य सरकारने दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.



यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोना काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा ! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील! गेल्या एक-दोन महिन्यांपासून राज्यातील मंदिर उघडण्यासाठी आंदोलनं सुरु होती. भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलनं केली होती. तर वंचित बहुजन आघाडीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता. याशिवाय एमआयएमनेही प्राथर्नास्थळं आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं. अखेर आठ महिन्यांनी भाविकांना आता मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर घुसखोरी नेटवर्कचा मास्टरमाइंड चांद मियाँ अटकेत!

बेकायदेशीर घुसखोरी नेटवर्कचा मास्टरमाइंड चांद मियाँ अटकेत!

दिल्ली पोलिसांनी घुसखोरीचे नेटवर्क उद्ध्वस्त केले असून मुख्य सूत्रधार चांद मियाँसह सहा बांगलादेशी घुसखोर आणि पाच भारतीय एजंटना अटक केली आहे. हे भारतीय एजंट बांगलादेशींना भारतात घुसखोरी करण्यास मदत करायचे, त्यांच्यासाठी बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे बनवायचे आणि त्यांना आश्रयही द्यायचे. बंगाल आणि मेघालयातून बांगलादेशींना घुसखोरी केल्यानंतर, एजंट बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना देशाच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक करायचे. आरोपी चाँद मिया यांने दिल्लीत ३३ बांगलादेशींची भारतीय कागदपत्रांसाठी नोंदणी करून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121