न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल होणार
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी स्टँड अप कोमेडिअन कुणाल कामराविरोधात खटला दाखल करण्यात येणार आहे. सतत अर्णब गोस्वामीविरोधात टीका करणाऱ्या कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अॅटर्नी जनरल के.के.वेणूगोपाल यांनी दिले आहेत. रिपलब्लिक टीव्हीचे प्रधान संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आला त्यासंदर्भात ट्विट करत असताना कुणालने न्या. चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयातविरोधात नाराजी व्यक्त केली.
याविरोधात त्याने ट्विट केली. त्यासंदर्भात पुण्यातील वकिलांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे तक्रार केली होती. आता अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी कुणाल कामराविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या ट्विटमुळे कुणाल कामराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला. त्यावर नाराजी व्यक्त करत कुणाल कामराने हे ट्विट केले होते. त्यापूर्वी त्याने वारंवार अवमान होईल, अशी ट्विट केली आहेत.