“आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा पारित करा”

    04-Oct-2020
Total Views | 18
 
Ashish Deshmukh_1 &n
मुंबई : हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही कठोर कायदे करण्याची मागणी होत आहे. यावेळी कॉंग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून, ‘आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही ‘महाराष्ट्र दिशा कायदा’ पारित करण्याची गरज आहे असे सांगितले आहे.
 
 
 
“आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘महाराष्ट्र दिशा कायदा’ पारित करण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण विधानसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्रात ‘दिशा कायदा’ त्वरित पारित करावा,” अशी मागणी त्यांनी या पत्रामध्ये केली आहे. तसेच, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहे, त्यावरही निर्बंध घातले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121