बांगलादेशशी तुलना योग्य की अयोग्य?

    21-Oct-2020   
Total Views | 147
Bangladesh_1  H
 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने विकासदराची आकडेवारी जाहीर केली आणि राहुल गांधींसारख्या विरोधकांना बोलण्यासाठी आयते कोलीत मिळाले; अर्थात देशातील आर्थिक स्थिती चांगली नाही, हे खरेच; मात्र ती दाखविण्यासाठी बांगलादेशचे उदाहरण द्यावे, हे विरोधकांचे दुर्दैव.
 
 
जगातील सुखी आणि आनंदी देशांमध्ये पाकिस्तान आपल्या वरचढ असतो हे दाखविणारी आकडेवारीही तशीच; अर्थात नाणेनिधीच्या आकडेवारीचा चुकीचा संदर्भ घेऊन त्याला भारतापेक्षा श्रेष्ठ दाखविण्याचा जो प्रकार होतो, त्याचीच पोलखोल भारतातील काही अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी केली आहे. या प्रकरणाला नेमकी सुरुवात झाली ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालावरून. बांगलादेश हा प्रतिव्यक्ती सकल घरेलू उत्पादनात भारताच्या वरचढ ठरला. यावरून सरकारवर टीका करण्यात आली. आता नेमक्या आर्थिक निकषांवर याबद्दल चर्चा होऊ लागली आहे.
 
 
‘आयएमएफ’चा अहवाल काय सांगतो ते पाहू. यात दावा करण्यात आला आहे की, भारताचा २०२० या आर्थिक वर्षातील विकासदर हा उणे दहा टक्क्यांवर असेल. काही महिन्यांपूर्वी ‘आयएमएफ’नेच हा विकासदर उणे ४.५ टक्के इतका व्यक्त केला होता. नव्या अनुमानात हा दर आणखी घसरला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बांगलादेशींचे प्रतिव्यक्ती उत्पन्न या वर्षी भारताच्या पुढे गेले आहे. राहुल गांधींनी या संदर्भात एक तक्ता तयार शेअर केला आहे. त्यानुसार, १९८१ मध्ये भारताचा विकासदर प्रतिव्यक्ती २७४.७ डॉलर इतका होता. २०२० पर्यंत तो १ हजार ८७६.५ डॉलर इतका झाला आहे.
 
 
बांगलादेशची तुलना केली, तर प्रतिव्यक्ती २६३.७ डॉलर वाढून तो १ हजार ८८० डॉलर इतका झाला आहे. १९९० ते १९९३ मध्ये बांगलादेश आर्थिक बाबतीत पुढेच होता. भारत या शर्यतीत मागे राहिल्याचे सांगितले जात आहे. हीच ती आकडेवारी भारताची अर्थव्यवस्था जगात दखल घेण्याइतकी राहिली नाही का? तर याचे उत्तर नाही, असेच येईल.विकासदर ठरवत असताना साधारणतः जीडीपी विकासदर किंवा परिपूर्ण जीडीपी यांना पाया मानले जाते.
 
 
भारताची अर्थव्यवस्था बांगलादेशच्या तुलनेत या दोन्ही मुद्द्यांवर पुढे आहे. केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार असलेले अरविंद सुब्रह्मण्यम यांनीही बांगलादेशच्या या वरचढ असण्याबद्दल ट्विटरवर ‘फॅक्ट’ सांगितले आहेत. ‘आयएमएफ’च्या डेटाद्वारा भारत आणि बांगलादेश या दोन देशांची तुलना होऊ शकत नाही, असेच तेही म्हणतात. ही तुलना आणखी दहा वर्षेतरी होणे शक्य नाही. कारण, ‘जीडीपी विकासदर’ किंवा ‘परिपूर्ण जीडीपी’ हा बांगलादेशच्या दहापट जास्त आहे.
 
 
 
जीडीपी मोजताना प्रतिव्यक्ती उत्पन्न काढत असताना देशाच्या लोकसंख्येशी भागले जाते. निश्चित बांगलादेश विकास करत आहे. मात्र, हे तीन मुद्देही समजून घेणे गरजेचे आहेत. आर्थिक स्थितीचा विचार केला असता, बांगलादेश आणि भारताची परिस्थिती २००४ ते २०१६ पर्यंत बदललेली नाही. २०१७ नंतर भारताची आर्थिक स्थिती नाजूक होत आहे आणि बांगलादेश गती घेत आहे.
भारताची लोकसंख्या १५ वर्षांत २१ टक्के वाढली, तर बांगलादेशची लोकसंख्या १८ टक्क्यांपेक्षा कमी गतीने वाढली. साहाजिकच हा परिणामही जाणवला. २००७ मध्ये बांगलादेशचे प्रतिव्यक्ती उत्पन्न भारताच्या तुलनेत अर्धे होते. २०१४ मध्ये ते ७० टक्के झाले. कोरोनामुळे विकासदरात भारत दहा टक्के घसरला, तर बांगलादेश मात्र, चार टक्क्यांवर आहे. हे पाहिल्यावर मात्र बांगलादेश हा जगाच्या नकाशावर चमकला हे म्हणायला हरकत नाही.
 
 
बांगलादेशने केवळ स्वस्तातील मजुरांचा देश, अशी ओळख पुसण्याचाही प्रयत्न केला. कित्येक सामाजिक निष्कर्ष अहवाल सांगतात की, बांगलादेश भारताच्या तुलनेत गतीने सुधारणा करण्याच्या शर्यतीत पुढे आहे. पाकिस्तानपासून वेगळा झालेला हा देश सुरुवातीला कठीण संघर्षातून जात होता. त्यानंतर सुधारणा करण्यात यशस्वी ठरला. कामगार कायदे तितकेसे सशक्त नसल्याने हा फायदा झाला. महिलांचेही योगदान दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. त्यामुळे तुलना चुकीची नसली तरीही पाकिस्तानपासून मुक्त झाल्यापासून बांगलादेशची धडपड वाखाण्याजोगी आहे, हे नक्की. 

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

अग्रलेख
जरुर वाचा
५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात  घरवापसी

५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात घरवापसी

Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121