'तनिष्क' समर्थनात फेक 'ट्विटस्' : कारवाईच्या ईशाऱ्यानंतर 'डिलीट'

    16-Oct-2020
Total Views | 1319
Tanishq_1  H x




मुंबई (महाMTB विशेष)
: 'तनिष्क'या टाटा उद्योगसमूहाच्या दागिनेविक्री व्यवसायाची 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देणारी जाहिरात वादाचा विषय ठरते आहे. देशभरातील हिंदूंनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यावर तनिष्कने ही जाहिरात मागे घेतली. परंतु त्यानंतर हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्यांनी हिंदुत्ववादयांना खिजवण्यासाठी 'ट्विटर'-'फेसबुक'वर फेक बातम्या प्रसारित करण्याची सुरवात केली होती. मात्र, वस्तुस्थिती समोर आणून कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर आता हिंदुत्वविरोधक स्वतःच्या पोस्ट-ट्विट डिलीट करू लागले आहेत.



 
 
राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे साकेत गोखले, 'द इंडेपेडन्ट'च्या कथित पत्रकार स्तुती मिश्रा यांनी असा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. पत्रकार असल्याचे सांगणाऱ्या स्तुती मिश्रा नावाच्या ट्विटर हँडल वरून दोन बनावट ट्विट करण्यात आले होते. शेफाली वैद्य यांनी 'तनिष्क'च्या जाहिरातीचा निषेध नोंदवला आणि त्याविरोधात बहिष्कार मोहिमही चालविली.
 
 


1_1  H x W: 0 x

'शेफाली यांनीच तनिष्कमधून दागिने विकत घेतल्याचा ट्विटरवर फोटो शेअर केला आहे', अशा आशयाच्या शेफाली यांच्या ट्विटचा एक बनावट फोटो स्तुती मिश्रा यांनी प्रसारित केला होता. साकेत गोखले यांनीही हा प्रकार केल्याचे म्हटले जात आहे. "हा फोटो खोटा असून डिलीट करा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जायला तयार रहा", असा कडक इशारा शेफाली वैद्य यांनी दिला. त्याबरोबर तथाकथित लिबरलांनी संबंधित ट्विट डिलीट केले. स्तुती मिश्रा या कथित पत्रकाराने तर थेट अकाउंटच डिलीट केले असल्याचे समजते.


 
 
 
'तनिष्क'विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सर्वाधिक असंतोष व्यक्त केला होता. त्यामुळे सोशल मिडियावर बनावट अकाउंट बनवून किंवा पैसे खर्च करून हिंदूंच्या खच्चीकरणाचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. साकेत गोखलेंच्या सहभागाने यात राहुल गांधींचे नावही जोडले गेले. परंतू; हिंदुत्वाचा हुंकार सगळ्यांचाच पर्दाफाश करतो आहे. झुंडीने खोटारडेपणा करून मला खोटे ठरवण्याचा हा काही पहिला प्रयत्न नव्हता. परंतु दरवेळी सत्य समोर येते आणि सत्याचा विजय होतोच. त्या सर्वांनी स्वतःचे ट्विट्स डिलीट करून ओढवलेल्या नाचक्कीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र दिलगिरी व्यक्त करण्याचे नैतिक धैर्य कोणीही दाखवू शकलेले नाहीत. - शेफाली वैद्य, लेखिका




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121