केरळमध्ये राज्यपालांवर सीएएविरोधी ठराव वाचण्याची नामुष्की

    29-Jan-2020
Total Views | 73


केरळ विधानसभा _1 &nb


सीएएवरून केरळ सरकार आणि राज्यपाल यांच्यात मतभेद



थिरूवनंतपुरम
: केरळ विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ‘युनायटेड डेमोक्रॅटिक आघाडी’च्या आमदारांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना घेराव घातला. ‘गव्हर्नर गो बॅक’ अशा घोषणा देत त्यांनी पोस्टरही दाखवले. केरळ विधानसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सीएएविरूद्ध राज्य सरकारच्या ठरावाचे वाचन केले. राज्यपालांच्या नकारानंतर सीएम पिनारायी विजयन यांनी राज्यपालांना विनंती केली, त्यानंतर आरिफ मोहम्मद खान यांनी हा ठराव वाचला पण राज्यपालांनीही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत एकमत नसल्याचे सांगितले. राज्यपालांनी संबोधित करायला सुरुवात केली तेव्हा विरोधी सदस्य घोषणाबाजी करत विधानसभेबाहेर गेले. या वेळी मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी आमदारांना समजावतानाही परत जाण्याचे आवाहन केले.



राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, “मी हा परिच्छेद वाचणार आहे जो सीएएच्या विरोधात आहे. कारण मुख्यमंत्र्यांची मी तो वाचावे अशी इच्छा आहे, जरी मला विश्वास आहे की हा कार्यक्रम अंतर्गत येत नाही.” केरळ विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सभागृहात प्रवेश करताच यूडीएफच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आमदारांनी सीएए आणि एनआरसी बद्दल घोषणाबाजी केली आणि ‘गव्हर्नर गो बॅक’ च्या घोषणा दिल्या. निषेध करणार्याद आमदारांनी राज्यपालाचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा मार्शल राज्यपालांना त्यांच्या आसनापर्यंत घेऊन गेले.


सीएएबद्दल केरळ सरकार आणि राज्यपाल यांच्यात मतभेद


केरळ सरकार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत बरेच मतभेद आहेत. सीएएविरोधात केरळ सरकारही सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्याचवेळी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळ सरकारचा सीएए हटविण्याचा प्रस्ताव फेटाळला. आरिफ म्हणाले होते की, केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव संमत करण्याचा कोणत्याही राज्याला घटनात्मक अधिकार नाही.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121