महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक

    25-Jan-2020
Total Views | 85


maharashtra police_1 


नवी दिल्ली : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहिर केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील १० पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, ४ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहिर झाले आहे. देशातील १०४० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील ५४ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.



प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलिस पदक
, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगीरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील १०४० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. देशातील ४ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, २८६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर ९३ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि ६५७ पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहिर झाले आहे.



महाराष्ट्राला
जीवन रक्षा पदक

संकटात सापडलेल्यांना वाचवून मानवतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना जीवन रक्षा पदक दिले जाते. महाराष्ट्रातील व्यक्तींना जीवन रक्षा पदक जाहिर झाले आहे. यामध्ये महेश पांडुरंग साबळे यांना सर्वोत्तम रक्षा पदक जाहिर झाले आहे. मुंबईतील कमला मिल आग दुर्घटनेत साबळे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले होते.



अग्निशमन सेवा पदक

अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनिय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील ७ अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहिर झाले आहे.




शौर्य पदक : 

मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे,आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, डॉ.एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हमीत डोंगरे


विशिष्ठ सेवा पदक :

 श्रीमती अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा.पोलिस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक)

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121