नवी दिल्ली : ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणारे आणि पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या सौरभ भारद्वाज यांच्यावर भाजप नेत्या शाझिया इल्मी यांनी निशाणा साधला. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि ग्रेटर कैलाश विधानसभेचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांचा ईव्हीएमवर विश्वास नसताना, निवडणूक लढविण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित करत सौरभ भारद्वाज यांना लक्ष्य केले. सौरभ भारद्वाज यांनी २०१७मध्ये विधानसभेत ईव्हीएम सारखी मशीन हॅक करण्याचा थेट डेमो केला होता.
Why is Saurabh Bhardwaj candidate (the same fellow who was demonstrating how an EVM can be hacked in the Dehi Assembly) bothering to fight elections when he has no faith in them ?Vote for @shikharaibjp and not this conman! @BJP4Delhi https://t.co/KHg1bcW0eh
— Shazia Ilmi (@shaziailmi) January 21, 2020
भारद्वाज यांनी विधानसभेत ईव्हीएम हॅकिंग डेमो दाखविला होता
सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीतील एमसीडी निवडणुकीत ईव्हीएम हॅकिंगचे दावे केले होते. इतकेच नाही तर त्यांनी २०१७ला विधानसभेत याचे थेट प्रात्यक्षिक देखील दाखवत भाजपवर ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला. तथापि, भारद्वाज यांच्या दाव्याला निवडणूक आयोगानेच साफ नकार दिला आणि म्हटले की कोणत्याही प्रकारे ईव्हीएम मशीन हॅक करता येत नाही.