जेव्हा संजय राउतच बाळासाहेबांची तुलना छत्रपतींशी करतात [वाचा संदर्भासह]

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020   
Total Views |


संजय ४_1  H x W



'आज का शिवाजी : नरेंद्र मोदी' या पुस्तकावर राउत टीका करतात पण...


विशेष वृत्त (सोमेश कोलगे) : 
संजय राउत यांनी सामनामधून तसेच स्वतःच्या ब्लॉगद्वारे बाळासाहेब ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हटले होते. त्यांच्या त्या सर्व लेखांचे एकत्रित 'युगान्त' हे पुस्तक संजय राउत यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखही एकेरी करण्यात आला आहे.
दिनांक २० नोव्हेंबर २०१२ रोजीच्या लेखात संजय राउत लिहितात , "शिवसेनाप्रमुखांकडे पाहायला लागलो म्हणजे एकदम शिवाजी दिसायला लागायचे."

संजय _1  H x W:



 
दिनांक २३ नोव्हेंबर २०१२ रोजी संजय राउत यांनी 'संजय उवाच' असा लेख लिहिला आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूचे वर्णन त्यात करतना शिवाजी महाराजांची उपमा संजय राउत यांनी शिवसेनाप्रमुखांना दिली होती. संजय राउत लिहितात, " महाराष्ट्राने त्यांचा दुसरा शूर शिवाजी गमावला आहे यातच सर्व आले."



संजय २_1  H x W

युगान्त पुस्तकाच्या पान क्र. ८८ वर संजय राउतांनी लिहिले आहे की, "अयोध्येतील राममंदिराची जागा , रायगडावरील शिवाजी महराजांच्या समाधी स्थळाची जागा आणि शिवतीर्थावरील बाळासाहेबांचे समाधीस्थळ या जागांचे पावित्र्य सारखेच आहे."



संजय ४_1  H x W


दिल्लीतील काही भाजप कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराज यांची थेट तुलना झाल्याने भारतीय जनता पक्ष टीकेचा धनी झाला आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा संजय राउत यांनीही दिली होती, हे खूप कमी जणांना ठाऊक असेल. 

(संदर्भ-संशोधन साहाय्य: पंकज व्यवारे)
@@AUTHORINFO_V1@@