भारत आणि रशिया परकीय हस्तक्षेपाच्या विरोधात : पंतप्रधान

    05-Sep-2019
Total Views | 11



ब्लॉदिवोसतॉक : "कोणत्याही देशाच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये भारत आणि रशिया परकीय हस्तक्षेपाच्या विरोधात आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सांगितले. बुधवारी झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, अणुऊर्जा, संरक्षण, अंतराळ क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत, तसेच दोन्ही देशांना जोडणाऱ्या समुद्री मार्गाबाबत चर्चा केली.

 

पंतप्रधान मोदी सध्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान ते पूर्व आर्थिक मंचाच्या बैठकीसही उपस्थित राहतील. रशियातील पूर्व क्षेत्राला भेट देणारे ते भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. "दोन्ही देश कोणत्याही देशाच्या अंतर्गत प्रकरणांमधील परकीय हस्तक्षेपाच्या विरोधात आहेत," असे मोदी यांनी बैठकीनंतर आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. भारताने जम्मू-काश्मिरातील कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर मोदींनी हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. कलम ३७० रद्द करणे, ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे भारत सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगत आहे. या मुद्द्यावर रशियाने भारताचे समर्थन केले असून, हा बदल भारतीय घटनेप्रमाणे करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. भारत-रशियातील २०व्या वार्षिक परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांनी प्रतिनिधी मंडळ पातळीवर दोन तास चर्चा केली. दोन्ही देशांमधील विशेष संबंध अधिक बळकट करण्यासाठी ही बैठक एका जहाजावर आयोजित करण्यात आली होती.

 

"रशियाच्या काही निवडक भागीदारांपैकी भारत एक आहे. या दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक आणि विशेष संबंध आहेत," असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सांगितले. ऊर्जा पुरवठा क्षेत्रामध्ये रशिया हा भारताचा विश्वासू सहकारी आहे. मागील वर्षी ३३ दशलक्ष टन तेलाची निर्यात भारताला केली. यामध्ये ५५० हजार टन तेल उत्पादने आणि ४५ लाख टन कोळशाचा समावेश असल्याचे पुतीन यांनी सांगितले. कुडनकूलम् हा महत्त्वपूर्ण अणुप्रकल्प दोन्ही देशांमधील सहकार्याचे प्रतीक असून, याचे दोन युनिट अगोदरच सुरू झाले आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेनुसार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

चेन्नई ते ब्लॉदिवोसतॉक समुद्रीमार्ग

 

चेन्नई ते ब्लॉदिवोसतॉक दरम्यान पूर्ण समुद्री मार्गाचा प्रस्ताव देण्यात आला. या समुद्रीमार्गाचा विकास करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केल्याची माहिती मोदी यांनी यावेळी दिलीअंतराळवीरांना प्रशिक्षण भारत आणि रशियाच्या सहकार्याने तयार होणाऱ्या अणुप्रकल्पांचे स्थानिकीकरण वाढत असून, यामुळे आम्ही या क्षेत्रात खऱ्या अर्थाने भागीदारी विकसित करीत आहोत. गगनयान प्रकल्पांतर्गत भारत मानवी अंतराळ मोहीम हाती घेणार आहे. रशिया या मोहिमेतील अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी भारताला मदत करणार आहे.

 

१५ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान संरक्षण, हवाई आणि समुद्रमार्गे जोडणी, ऊर्जा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम क्षेत्र आणि व्यापारासह एकूण १५ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121