ऐतिहासिक : विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अमित पांघल अंतिम फेरीत

    21-Sep-2019
Total Views | 27



नवी दिल्ली : भारताचा बॉक्सर अमित पांघलने पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणारा अमित हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. हरियाणाच्या अमितने ५२ किलो वजनी गटात खेळताना उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या साकेन बिबिसोनोवला ३-२ ने हरवले. शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात अमितची गाठ रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या शाखोबिदीन जोइरोवशी पडणार आहे.

 

आत्तापर्यंत पुरुषांमध्ये ५ भारतीय बॉक्सिंगपटूंनी विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावले होते. २००९ मध्ये विजेंदर सिंगने हा पराक्रम केला होता. त्यानंतर २०११ मध्ये विकास कृष्णन आणि २०१५ मध्ये शिवा थापाने उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली होती. २०१७ मध्ये गौरव विधूडीने या स्पर्धेत कांस्तपदक पटकावले होते. या वर्षी मनीष कौशिकने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, ६३ किलो वजनी गटात क्युबाच्या एंडी क्रूजकडून त्याला पराभव स्विकारावा लागला.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121