जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचे छापे

    23-Aug-2019
Total Views | 26


नवी दिल्ली: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीमधील एकूण १२ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. तपास यंत्रणांच्या मते, २०१४ मध्ये करण्यात आलेल्या गुंतणुकीदरम्यान एफडीआयच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले.

 
 
१९९२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जेट एअरवेजच्या बोर्डावरुन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने मार्च महिन्यात राजीनामा दिला होता. १७ एप्रिल रोजी जेट एअरवेज पूर्णपणे ठप्प पडली. कोर्पोरेट मंत्रालयाच्या अहवालानुसार, जेट एअरवेज कंपनीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. गोयल यांनी मार्च महिन्यात कंपनीच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला आहे. जेट एअरवेजवर ८५०० हून अधिक कर्ज आहे. जर कर्मचाऱ्यांचा पगाराचा आकडा यासोबत जोडला गेला तर ही रक्कम ११ हजार कोटींपर्यंत पोहोचते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121