महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची एनडीआरएफकडून सुटका

    27-Jul-2019
Total Views | 122

 

 
 
मुंबई : गेल्या २४ तासांपासून मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली याभागात जोरदार पाऊस कोसळतो आहे. मुसळधार पावसामुळे उल्हासनदीला दुथडी भरुन वाहू लागली आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर तसेच बदलापूर या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि अजूनही सुरु असलेल्या पावसामुळे कल्याण ते कर्जत रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही स्थानकांवर तसेच कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
 
 

काल रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची एनडीआरएफकडून सुटका करण्यात आली. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने रात्रीपासून मदतकार्य सुरु केले आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भातली माहिती दिली आहे. रेल्वेमध्ये जे प्रवासी अडकून पडले होते त्यांना सोडवण्यात आले असून त्यांना जवळच्या प्लॅटफॉर्मवर आणले गेले. एनडीआरएफ आणि नौदलाच्या मदतीने अडकलेल्या सुमारे अकराशे प्रवाश्यांची सुटका केली. मुसळधार पावसाने मदत कार्यात वारंवार अडथळे येत होते त्याची तमा न बाळगता जवानांप्रमाणेच पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी देखील चोख कामगिरी बजावली.

नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी एनडीआरएफच्या मदतीला नौदलाची एक टीमही घटनास्थळी उपस्थित झाली आहे. सोबतच नौदलाचे एक हेलिकॉप्टरही तैनात आहे. सुरुवातीला महिला आणि लहान मुलांना बोटीच्या सहाय्याने रेल्वेतून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात येते आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि पुरुषांनाही हलवण्यात येईल. रेल्वेतून जवानांनी बोटीतून प्रवाश्यांना सुखरूप उतरवले यात काही वृद्ध , आजारी पुरुष महिला प्रवासी देखील होते , एनडीएफ आणि ग्रामस्थांमुळे आम्ही सुखरूप आहोत, कल्याण सोडल्यानंतर अंबरनाथला गाडी यायला किमान तीन तासाचा कालावधी लागला.

गाडी अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्येही थांबवण्यात आली होती, बदलापूरच्या पुढे लोहमार्गात पावसाचे पाणी साचले आहे अशी अनाउन्समेंट अंबरनाथला केली असताना गाडी बदलापूरच्या पुढे का नेली असा संतप्त सवाल काही प्रवाशांनी उपस्थित केला. याच गाडीतून काही गर्भवती महिला देखील प्रवास करत होत्या. काही वयस्कर आणि आजारी प्रवाश्यांचे सामान वाहून नेण्यास ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी सहकार्य केले.
 
 
 

24 तास मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

मुंबई विभागात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढचे २४ तास मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतून उड्डाण घेणाऱ्या ७ फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर ८ फ्लाईट्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शाळांच्या सुट्टीचा निर्णय हा त्या विभागातील मुख्याध्यापकांनी घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121